प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घेतली भेट
जळगाव, (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित झाले असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत दि. ५ डिसेंबर रोजी भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ही देवकर यांचा संपर्क झाला. त्यांच्या पक्ष प्रवेशाला श्रेष्ठींनी हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत देवकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याबाबत आग्रह केला. त्यानुसार हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगत देवकर यांनी दुजोरा दिला.
गुलाबराव देवकर यांचा पक्ष प्रवेश दोन तीन दिवसात होण्याची शक्यता असून त्यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कारकर्त्यानी शरद पवार गटातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कोण कुठल्या गटात राहणार याबाबत तर्क लढविले जात आहे.
VIDEO