• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुणे येथे पवना धरणात भुसावळच्या २ तरुणांचा बुडून मृत्यू !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
पुणे येथे पवना धरणात भुसावळच्या २ तरुणांचा बुडून मृत्यू !

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील मूळ रहिवासी व हल्ली पुणे येथील बालेवाडीतील खाजगी कंपनीत कार्यरत असलेल्या भुसावळ येथील दोघा उच्चशिक्षीत तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यामुळे भुसावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मयूर रवींद्र भारसके (वय २५) व तुषार रवींद्र अहिरे (वय २६) असे त्यांचे नावे आहेत. दोघेही सध्या पुणे येथे राहत होते. तर भुसावळातील लाल जैन मंदिर पाठिमागे, पद्मावती नगर येथील मूळ रहिवासी आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत सिनियर सेल्स एक्झीकेटीव्ह या पदावर कार्यरत मयूर व तुषार हे दोघे मित्र आपल्या अन्य आठ मित्रांसह पवना धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने सदर घटना घडली असल्याचे समजते. दोघे मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडा-ओरड केली. तसेच स्थानिकांना माहिती दिली. शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोघांना २० तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन अग्रवाल यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने विना मोबदला थेट खंडाळा (पुणे) येथून भुसावळ येथे मृतदेह पोहचविण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिली.

धरणात बुडालेल्या तुषार (सोनू) अहिरे याचे वडील रवींद्र अहिरे यांचे गेल्या मार्च महिन्यात निधन झाले तर आजोबा प्रकाश देवराम अहिरे यांचे गत नोव्हेंबर महिन्यात १३ रोजी निधन झाले. या दुःखाःतून परिवार सावरत नाही, तोच घरातील कर्त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अहिरे परिवार मूळ खडकदेवळा, ता.पाचोरा येथील रहिवासी असून रेल्वे नोकरीनिमित्त भुसावळात स्थायिक आहे.

Next Post
बलात्कारातून गर्भवती झालेल्या महिलेची आत्महत्या

बलात्कारातून गर्भवती झालेल्या महिलेची आत्महत्या

ताज्या बातम्या

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व
खान्देश

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व

February 7, 2026
प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद
खान्देश

प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ
खान्देश

पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; जिल्ह्यात खळबळ

February 4, 2026
खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार
खान्देश

खोट्या नोटा देऊन व्यापाऱ्याला सहा लाखांचा गंडा; जळगावमधी प्रकार

February 4, 2026
एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

February 3, 2026
भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत
क्रिडा

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत

February 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group