किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त तालुक्यातील तेली समाजाच्या वतीने दि.८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे.
मंत्री गिरीश महाजन व साधना महाजन यांच्या हस्ते नगरपरिषद चौक जामनेर या ठिकाणी प्रतिमा पूजन करून श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील गोपाल नगर येथील संत जगनाडे महाराज सभागृह येथून शोभायात्रा निघणार आहे.
शोभायात्रा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असून शोभायात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन पांढरा पोशाख व महिला भगिनींनी भगवी साडी परिधान करून यावे असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.