• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकर्‍यांनी कृषी उद्योगाकडे वळावे.. – कुर्बान तडवी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 30, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा
0
शेतकर्‍यांनी कृषी उद्योगाकडे वळावे.. – कुर्बान तडवी

प्रदर्शनाला दोन दिवसात हजारो शेतकऱ्यांच्या भेटी

जळगाव, (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांनी आता स्वावलंबी झाले पाहिजे. आपल्या शेतमालावर प्रक्रिया करून आपला माल कसा विकता येईल, त्याची साठवणूक कशी करता येईल याबाबत विक्रीचे नियोजन करावे. अद्ययावत कृषी तंत्रज्ञान कृषी यंत्रांची तसेच अपारंपारिक पिकांची माहिती घेण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले.

जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यानच्या अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील आदर्श शेतकरी, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त श्री. तडवी बोलत होते. माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, निर्मल सिडसचे डॉ. जे. सी. राजपूत, प्लांटो कृषी तंत्रचे निखिल चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, माजी आ.ॲड. जयप्रकाश बाविस्कर, आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, मनसेचे शहराध्यक्ष जमील देशपांडे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

हजारो शेतकर्‍यांच्या भेटी..
प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी (शनिवारी) हजारो शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला भेट दिली व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनाला दोन दिवसात सुमारे ५० हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी भेट दिली. प्रदर्शनात एकूण २०० हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सोमवार (दि.२ डिसेंबर) पर्यंत प्रदर्शन सुरु आहे.

शेतकरी घेताहेत याची माहिती..
छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना परवडतील अशी कृषी यंत्र व औजारे, खतांच्या बाबतीत नॅनो टेक्नॉलॉजी, फवारणीसाठीचे ड्रोन, सोलरवरील वीज पंपाचा डेमो, झटका मशीन, विविध पिकातील करार शेती, टिशूकल्चर केळी, ठिबकचे नवतंत्रज्ञान तसेच बियाणे मधील नवीन व्हरायटी बाबत माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

 


Next Post
जामनेरपुरा येथे घराला आग ; आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक

जामनेरपुरा येथे घराला आग ; आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group