जळगाव, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची धामधूम पार पडताच सर्व लोकप्रतिनिधी आपआपल्या कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच लग्नकार्य, अंत्यविधी, द्वारदर्शन आदींच्या माध्यमातून मतदारसंघात पूर्वीप्रमाणे गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
राजकारणात लोकसंपर्काला सर्वाधिक महत्त्व असते. यात लग्नकार्य, वास्तुशांती, अंत्यविधीपासून अन्य कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना हजेरी लावे लागते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांशी संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांच्या पारड्यात भरभरून मते पडली, असा काहीसा अनुभव सर्व दिसून आला. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे जेष्ठ चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनीही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत जनसंपर्क वाढवून स्वतःची वेगळी अशी प्रतिमा निर्माण केली आहे.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये द्वारदर्शनपर भेट देऊन संबंधित कुटुंबीयांची आस्थेवाईक प्रमाणे चौकशी केली.
बोलताना प्रतापराव पाटील म्हणाले की, केवळ निवडणुकीच्या काळातच आमचा जनसंपर्क नसतो तर वर्षातले ३६५ दिवस मंत्री महोदयाप्रमाणे आम्ही सर्वजण सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. पूर्ण मतदारसंघ आमच्यासाठी एका कुटुंबाप्रमाणे आहे. यामुळे त्यांच्या घरी आनंद उत्सव असेल तर त्यात आम्ही देखील सहभागी होतो व त्यांच्या घरात काही दुःखद घटना घडली तर त्यातही त्यांच्या दुःखातही आम्ही एका कुटुंबीयांप्रमाणे सहभागी होतो, यात वेगळे असे काहीच नसल्याचे त्यांनी नमूद केले.