• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टँकर घुसले आसारीच्या दुकानात, चालकासह पादचारी तरूण ठार

एरंडोलजवळ घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 27, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
टँकर घुसले आसारीच्या दुकानात, चालकासह पादचारी तरूण ठार

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एरंडोल ते जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सीमेंटच्या टँकरने महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानास जबर धडक दिली. या घटनेत टँकर चालक हा जागीच ठार झाला असून पायी चालणारा तरुण हा उपचारदरम्यान मयत झाला आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर नाक्यानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील गतीरोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. एम. एच. १५ जे सी १९९५ या क्रमांकाचा सिमेंटचा टँकर भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गाने जात असताना गतिरोधकावर चालकाचा ताबा सुटल्याने थेट आसरीच्या दुकानात घुसला. या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद (वय २६, रा. चिलूला ता. हैदरगड, जि.बाराबंकी) हा जागीच ठार झाला. तर पादचारी शकील नबी बागवान (वय ३४,रा.एरंडोल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शकील नबी बागवान हे एरंडोल येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे संचालक होते. ते त्यांच्या भावाच्या लग्नासाठी कपड्यांसह इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी आई सोबत मालेगाव येथे गेले होते. रस्त्याच्या बाजूने पायी चालत असताना टँकरच्या मागील चाकात आल्यामुळे त्याचे दोघ पाय निकामी झाले.

दरम्यान, जळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. तर त्याची आई सुदैवाने बचावली. घटनास्थळी सकाळी मोठा जनसमुदाय जमला होता. याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणविरोधात संताप व्यक्त करत महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.

Next Post
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; कृषी यंत्र व औजारांवर भर

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; कृषी यंत्र व औजारांवर भर

ताज्या बातम्या

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!
खान्देश

हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!

October 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group