जळगाव, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघातील महायुती भाजपचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लीड घेत विजयाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल आमदार भोळे यांना मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय जनता अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अशफाक खाटीक व त्यांचे सहकारी तसेच मुस्लिम समाजाने प्रचारात मनापासून मेहनत केली. व राजूमामा भोळे यांच्या विजयात आपले योगदान दिले असल्याचे अशफाक खाटीक यांनी सांगितले.
दरम्यान अशफाक खाटीक व त्यांच्या सहकार्यानी ख्वाजामियाँ दर्गाह वर चादर अर्पण करून आ. राजुमामांच्या विजयासाठी मनापासून मन्नत मानली होती ती मन्नत पूर्ण झाल्याची भावना अशफाक खाटीक यांनी व्यक्त केली. तसेच आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांचे अभिनंदन केले.











