जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना सातव्या फेरी अखेर ६१ हजार ४४३ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी २३ हजार ११७ मते घेतली आहेत. त्यामुळे सध्या २८ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे ३८९१, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले १३००, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना ७७९, कुलभूषण पाटील ८९९, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना ७७९, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना ३२२ मते मिळाले आहेत.