• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

राज्यातून ५५० खेळाडूंची उपस्थिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 22, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
राज्यस्तरीय सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ३४ वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. तर या स्पर्धेसाठी २६ जिल्ह्यातील जवळपास ५५० खेळाडूंनी उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणूक निकाल उद्या जाहीर होईल आणि आपला आमदार निवडला जाईल तसेच सध्या सुरू असलेल्या या तायक्वांदो स्पर्धेत तुम्ही खेळून जिंकाल तेव्हा मैदानावरचे खरे आमदार तुम्ही असाल असे व्यक्तव्य या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले श्री जोशी यांनी करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.

महाराष्ट्र राज्यातील एकूण २६ जिल्ह्यातून सहभागी झालेल्या या खेळाडू मधुन २८ वजनी गटात प्रत्येकी एक प्रथम क्रमांक निवडला जाईल तर प्रथम क्रमांकाचे सर्व खेळाडू दिनांक २९ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर दरम्यान पंचकुला हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक अजित घारगे यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा संकुलात २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा सुरू राहणार असून या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केले असल्याचे आयोजक श्री घारगे यांनी प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags: #sports
Next Post
आ. राजूमामा भोळे २८ हजार मतांनी आघाडीवर ; जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात कमळ

आ. राजूमामा भोळे २८ हजार मतांनी आघाडीवर ; जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात कमळ

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group