• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बिबट्याला घाबरून तरुणीची विहिरीत उडी ; बुडून झाला मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
बिबट्याला घाबरून तरुणीची विहिरीत उडी ; बुडून झाला मृत्यू

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांबोळे शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्या आला. बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून शेतातील मजुरांनी गावाकडे धाव घेतली. यातील एक तरुणी घराकडे धावत सुटली. मात्र घाबरलेली तरुणीने विहिरीत उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. पाणी जास्त असल्याने यात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दि. १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे.

तालुक्यातील तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या. तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी स्नेहल देखील होते. सकाळी दहाच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (वय १८) ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती.

तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली. त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली. मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिने विहिरीत उडी घेतली. हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. पाटणा तांडा येथील पट्‍टीचे पोहणारे कैलास चव्हाण याना बोलावून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात एकापाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडून बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेत शिवारांमध्ये अजूनही बिबट्‍याचे दर्शन होत आहे.

Next Post
मतदान जनजागृती बद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

मतदान जनजागृती बद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group