• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रशासनाची तारांबळ | नदीला पाणी असल्याने बैलगाडीवरून नेले ईव्हीएम मशीनसह साहित्य !

अमळनेर तालुक्यातील सात्री येथील प्रकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 20, 2024
in जळगाव जिल्हा
0
प्रशासनाची तारांबळ | नदीला पाणी असल्याने बैलगाडीवरून नेले ईव्हीएम मशीनसह साहित्य !

नदीला पाणी असल्याने बैलगाडीवरून नेले ईव्हीएम मशीनसह साहित्य ! ; अमळनेर तालुक्यातील प्रकार

अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सात्री येथे बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचारी यांच्यासह ईव्हीएम मशीन, साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ प्रशासनावर आली. सात्री गावाला पूल नसल्याने या समस्येला निवडणूक कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागले

निवडणूकीचे साहित्य आणि कर्मचारी घेऊन बस डांगरी गावाला आल्यावर कर्मचारी आणि साहित्य बस खाली उतरवण्यात आले. दरम्यान बोरी नदीला पाणी आले असल्याने नदीतून एस टी जाणे शक्य नव्हते आणि साहित्य घेऊन कर्मचार्यांना पायी जाणे देखील शक्य नव्हते. यावेळी ग्रामस्थ सुनील बोरसे यांची बैलगाडी मागवण्यात आली. सर्व साहित्य आणि कर्मचाऱ्यांना बैलगाडीत बसवण्यात आले. अर्ध्या पाण्यात बैलगाडी आल्यावर वाळूत बैलगाडी फसली. बैलगाडी अडकली म्हणून पोलीस पाटील विनोद बोरसे, सरपंच महेंद्र बोरसे मदतीला धावले. बैलगाडी पाण्याबाहेर काढत तेथून कर्मचाऱ्यांना खाली उतरवून वाळूतून पायी केंद्रापर्यंत नेण्यात आले.

केंद्राचे प्रमुख तुषार पाटील यांनी सांगितले की, गुडघाभर पाण्यात बैलगाडी अडकली. बैलांकडून गाडी ओढली जात नव्हती तेव्हा भीती वाटली. एखाद्या आदिवासी पाड्यावर आलो की काय असे वाटत होते. पोलीस पाटील विनोद बोरसे यांची मदत झाली, असेही ते म्हणाले. विधानसभा अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ तालुक्यातील सात्री येथे आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे मध्ये बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही आणि नवीन पुनर्वसित गावचे भूखंड वाटप होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळी प्रशासनालाही त्याचा चांगलाच अनुभव आला.

Next Post
अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group