जळगाव, (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे मतदान जनजागृती रॅलीचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक होते. शिक्षिका शितल कोळी यांनी मतदान हे राष्ट्रहितासाठी श्रेष्ठदान कसे आहे हे पटवून दिले.
त्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले आई-वडील,वडिलांसह नातेवाईक, शेजारी यांना २० नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने वेळकाढून मतदान करावे. असा आग्रह करण्यात आला. तसेच मेहरूण गावातील ग्रामस्थांना मतदान जनजागृती करण्यात आली. मतदान जन जागृती साठी शाळेमध्ये भव्य रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.