विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल ३ हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार आहे. पाचोरा भडगाव मतदार संघ हा विकासाचे एक पॅटर्न मला करायचा आहे. पुढच्या पाच वर्षात राज्यात ‘पाचोरा-भडगाव पॅटर्न नावाजेल हा माझा शब्द आहे. असे मत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनतेने माझ्यावर सलग दोन टर्म प्रचंड विश्वास दाखवत मला विधानसभेत पाठविले. मी ही मतदारांच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. मी मायबाप जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्याने शंभर टक्के तिसऱ्यांदा मला ही जनता विधानसभेत पाठवेल असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
पाचोरा-भडगाव शहराचे रूपडे बदलवले..
या शेवटच्या अडीच वर्षात पाचोरा व भडगाव शहरात प्रचंड विकास कामे करण्याचा मी प्रयत्न केला. त्यात पाचोरा शहरात भूमिगत गटार योजना, रस्त्या काॅक्रीटीकरणाचा डीपीआर, खुल्या जागेचा विकास, शहरातील विविध व्यापारी संकुलांची निर्मिती, भाजी मंडई, हिवरा नदिवरील पुलाचे बांधकाम, वाचनालय, व्यापारी भवन, क्रीडा संकुल, अल्पसंख्यांक भागात केलेली कोट्यावधीची कामे, जनता वसाहत भागातील बौध्द विहारात सभामंडप, पेव्हर ब्लॉक, यासह इतर मागासवर्गीय वस्तीत झालेले विविध कामे, प्राचीन प्रभु श्रीराम मंदिर परिसराचा विकास, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महाराणा प्रताप चौक ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत शुसोभिकराचे सुरू असलेले काम असे एक ना शेकडो कामे आपण केली याशिवाय मंजुर करण्यात आलेले वारकरी भवन, कृषी भवनाचे कामे मार्गी लावले. तर भडगाव शहरात विकासाचे दालन उडविण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. शहरासाठी १३३ कोटीची पाणीपुरवठा योजना, ८२ कोटीची भूमिगत गटार योजना, सर्व ओपनस्पेसचा केलेला विकास, तळणी व श्री स्वामी समर्थ मंदिराचा पर्यटन विकासाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. साई मंदिर परीसरात करण्यात आलेले कामे, मुख्य रस्त्यांचे झालेले काॅक्रीटीकरण आदि कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केले. तर तब्बल १७० कोटीचा रस्ता काॅक्रीटीकरणाचा डीपीआर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.
ग्रामिण भागाचाही साधला विकास..
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, दोन्ही शहराचा जसा विकास केला. त्या प्रमाणातच ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे काम केले आहे. प्रत्येक गावात चौक सुशोभीकरणाच्या माध्यमातून शिवस्मारक, काही गावात वीर एकलव्य स्मारक, पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, व्यायामाचे साहित्य आदि कोट्यावधींचे विकास कामे पुर्णत्वास नेली. याशिवाय गडद, अग्नावती, तितुर नद्यांसह छोट्या नदी नाल्यांवर शेकडो बंधारे बांधून शेती समृध्द करण्याचे काम केले. गिरणा नदिरवर तब्बल सात ठीकाणी पुल बांधले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ताचे जाळे विनले. पहूर ते पाचोरा रस्त्यासाठी ३०० कोटी रूपये मंजुर केले आहेत. याशिवाय ३८० कीलो मिटरचे शेत पाणंद रस्ते मंजूर केले आहेत असे आमदार पाटील यांनी सांगीतले.
आरटीओ कार्यालयाने भडगावची देशभर ओळख..
भडगाव येथे आरटीओ कार्यालयाची १० वर्षापासूनची मागणी होती. त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र शासनाने चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय मंजुर केले. मात्र अशाही परीस्थीतीत भडगाव येथे जिल्ह्यातील तिसरे आरटीओ कार्यालय निर्माण करून भडगाव ची ओळख देशभर नेण्याचे काम केले. याशिवाय नगरदेवळा सुतगिरणीजवळ एमआयडीसीत मंजुर करून घेतली. त्यासाठी अडीचशे हेक्टर जमीन अधिग्रहहीत करण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यात पाचोरा येथील इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर भडगाव येथील जागा निश्चितीचे काम सुरू आहे.
आप्पांचे विकासाचे व्हीजन..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघ दत्तक घेण्याचे वचन दिले. त्यामुळे राहिलेला विकास पुर्ण करण्याचे माझे स्वप्न आहे. पुढच्या टप्प्यात पाचोरा व भडगाव तालुक्यात गिरणा नदीवर पक्के बंधारे बांधणार, नार-पार-गिरणा नदिजोड प्रकल्पाचे जास्तीचे पाणी मतदारसंघात आणणार, मंजुर एमआयडीसीत मोठे उद्योग आणून व सुतगिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मीती करणार. भडगाव शहरात छत्रपती शिवाजीमहाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनविणार, पाचोरा शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले,छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणार, पाचोरा शहरात नाट्यगृहाची निर्मिती करणार, इगतपुरीच्या धर्तीवर विपश्यना केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिवशृष्टी, भडगाव शहरातील रस्त्याचा १७० डीपीआर ला मंजुरी मिळवून देण्यासह विविध कामाचे स्वप्न मी उराशी बाळगले आहे असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुढील व्हीजनबाबत बोलतांना सांगीतले.
दरम्यान या सर्व विकासकामामुळे मायबाप जनता ही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला पुन्हा त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देईल याचा दृढ विश्वास मला असल्याचे देखील त्यांनी मुलाखतीच्या शेवटास सांगितले.