• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘बाळासाहेबांच्या पुण्याईने, जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार’..! – गुलाबराव पाटील

ममुराबाद, मोहाडी, दोनगाव, आव्हाणी परिसरात 'धनुष्यबाण'चा जयघोष !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 15, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
‘बाळासाहेबांच्या पुण्याईने, जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार’..! – गुलाबराव पाटील

जळगाव/धरणगाव, (प्रतिनिधी) : ममुराबाद, मोहाडी, दोनगाव, आव्हाणी, फुलपाट, धानोरा, टाकळी या भागात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी धनुष्यबाणाचा सळसळता जल्लोष पाहायला मिळाला आहे. माध्यमांशी संवाद साधताना, पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सांगितले की, “होय, हा सामान्य टपरीवालाच बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात चौथ्यांदा प्रवेश करणार आहे.” आपण गावोगावी रस्ते, मुलभूत सुविधा देवून, पूल बांधले आणि गावं जोडण्याचे काम करून जनतेच्या सुखं, दु:खात जावून माणस जोडण्याचे काम केल आहे.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा – मोहाडी पासून ममुराबादपर्यंत जल्लोषात प्रचार !
ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी गुलाबराव पाटलांचे रांगोळ्या काढून, फटाक्यांच्या आतषबाजीत व पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत केले. मोहाडी येथे घोड्यावरून, ममुराबादमध्ये ओपन जिपमधून आणि इतर भागात पायी रॅली काढून त्यांनी आपला प्रचार केला. विविध समाजांनी पाठिंबा देत पाटील यांना सन्मानित केले, तर ममुराबाद येथील शेतकऱ्यांनी धनुष्यबाणाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे आश्वस्त केले.

यांची होती उपस्थिती..
जिल्हा प्रमुख निलेश पाटील, संजय पाटील, डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, पवन सोनवणे, जनाआप्पा कोळी, अनिल भोळे, तुषार महाजन, ममुराबाद- महेश चौधरी, सरपंच हेमंत चौधरी, शैलेंद्र पाटील, भरत शिंदे, अमर पाटील, राहुल ढाके, संतोष कोळी, निखिल पाटील, सचिन पाटील, विकास शिंदे, विलास सोनवणे, नासीर पटेल, अनिस पटेल, ईजाज पटेल, मोहाडी – सरपंच डंपी सोनवणे, भगवान पाटील, योगेश बाविस्कर, राहुल पाटील, भरत सोनवणे, निंबा गवळी, किरणकेरू गवळी, वाल्मीक गवळी, राजू गवळी, युवराज निरखे, धानोरा – भुषण पाटील, गणेश पाटील, नाना पाटील, दोणगाव बुद्रुक व खुर्द किशोर पाटील, सरपंच भागवत पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, वासुदेव पाटील, सुभाष पाटील, ज्योतिताई शिवदे, पुष्पा पाटील, आव्हानी – सदाशिव पाटील, सचिन पाटील, तुषार पाटील, फुलपाट- हरिभाऊ पाटील, भिमसिंग पाटील, किरण पाटील, टहाकळी – जितू चव्हाण, मधुकर पाटील, सुनील पाटील यांच्यासह त्या-त्या गावातील ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
रोहीणी खडसेंच्या प्रचारात खा. अमोल कोल्हे यांचा रोड-शो

रोहीणी खडसेंच्या प्रचारात खा. अमोल कोल्हे यांचा रोड-शो

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group