• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुणी दिले लिंबू सरबत, कुणी खाऊ घातली पाणीपुरी, कचोरी तर कुणी केक..!

आ. राजूमामांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढतेच, शहरातील मार्केट परिसरात जोरदार स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
कुणी दिले लिंबू सरबत, कुणी खाऊ घातली पाणीपुरी, कचोरी तर कुणी केक..!

जळगाव, (प्रतिनिधी) : आपल्या हक्काच्या माणसाला कोणी लिंबू सरबत पाजले, तर कोणी पाणीपुरी, कचोरी खाऊ घातली, तर कोणी केक, मिठाई खाऊ घालत व्यापारी, दुकानदारांनी आ. राजूमामा भोळे यांच्यावरील प्रेमाला आणखीन घट्ट केले. हे दृश्य होते मंगळवारी संध्याकाळी भाजप, शिवसेना महायुतीच्यावतीने काढलेल्या रॅलीतील. मंगळवारी गोलाणी मार्केट, महात्मा फुले, केळकर मार्केट परिसरात प्रचार रॅलीत आ. राजूमामा भोळे यांनी व्यापारी, दुकानदारांच्या भेटी घेऊन शुभाशीर्वाद घेतले.

आ. राजूमामा भोळे यांनी प्रचारात दिवसेंदिवस आघाडी घेतली असून गेल्या ८ दिवसात अर्धे जळगाव शहर व्यापले आहे. आ. राजूमामा भोळे यांनी गोलाणी मार्केट मधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात केली. गोलाणी मार्केट, नवी पेठ, केळकर मार्केट, महात्मा फुले मार्केट मार्गे गांधी मार्केट येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. गोलाणी मार्केट येथे व्यापाऱ्यांशी हितगुज करून आ. भोळे यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली.

यावेळी, “राजूमामा, आज तुमच्या विजयाचे गणित पक्के आहे, तुम्ही नक्की विजयश्री मिळवाल” असा विश्वास व्यापाऱ्यांनी दिला. गोलाणी मार्केट परिसरात एका दुकानदाराने लिंबू सरबत पिण्यास देत तर नवी पेठ परिसरात एका दुकानदारांनी केक भरवत आ. भोळेंना शुभेच्छा दिल्या. तर केळकर मार्केट परिसरात एका विक्रेत्याने पाणीपुरी व कचोरी खाऊ घालून आ. भोळे यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले.

रॅलीत माजी जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्र. २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, जितेंद्र मराठे, अमित देशपांडे, राजू खेडकर, गोपाल पोपटानी, राहुल सनकत, जगदीश जोशी, अजय गांधी, कैलास सोनवणे, प्रवीण पाटील, दिशांत जोशी, संगीता समदानी, गीता नागला, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, आनंदा सपकाळे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, आरपीआय आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
खान्देश केटरिंग असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

खान्देश केटरिंग असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group