लालसिंग पाटील | भडगाव, दि. 10 – तालुक्यातील कजगाव येथे अनेक दिवसांनंतर पुन्हा भामट्यांनी तोंड वर काढले असून बस्थानक परिसरातील भर बाजारपेठेत भामट्यांनी बील्डिंग मटेरियलचे दुकान फोडून चोरी केली आहे. त्यामुळे कजगाव परीसरात भामट्यांच्या एन्ट्रीने पुन्हा घबराट पसरलेली आहे.
चाळीसगाव रस्त्यावरील ओमसाई बिल्डींग मटेरिअल या बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानावर मध्यरात्री चोरट्याने कुलून तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील जवळपास वीस हजार रुपये रोख रक्कम व आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्याचबरोबर देव्हाऱ्यातील चांदीचे शिक्के घेऊन पोबारा केला आहे. नेहमी प्रमाणे सकाळी दुकानावर आल्यावर मालक स्वप्नील पाटील व सहकाऱ्यांना चोरी झाल्याचे आढळुन आले. दरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे कजगाव येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान दुकान मालक स्वप्नील भरतसिंग पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली आहे.
चोरींचा सपाट सुरूच तपास मात्र शून्य..
गेल्या दीड महिना भरापूर्वी गावातील मेडिकल व किराणा दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. तर काही महिन्यापूर्वी मोटारसायकली चोरींचा सपाटा सुरू होता. आता मात्र दीड महिन्या नंतर चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेकडे आता पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरीकांमधून बोलले जात आहे.