पारोळा, (प्रतिनिधी) : एरंडोल व पारोळा विधानसभा मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी आज पारोळा तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी प्रचार दौऱ्यात गावातील ग्रामस्थांसह महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतला. यावेळी गावागावात ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले तर वृध्दांनी आशिर्वाद देवून आपला पाठींबा असल्याचे सांगितले.
पारोळा तालुक्यातील पळासखेडेसिम, मोरफळ/मोरफळी, मंगरूळ, चहुत्रे, वडगांव प्र.ए., धुळपिंप्री, लोणी बु, लोणीसिम, लोणी खु, बाहुटे, कन्हेरे या गावांत जाऊन उमेदवार माय-बाप जनतेच्या भेटी घेत शुभाशिर्वाद घेतले. विकासकामांसाठी महायुती सरकारला निवडून द्या. विविध कल्याणकारी योजना आजवर यशस्वीपणे महायुती सरकारने राबविल्या आहेत. एक व्हिजन घेऊन आम्ही सरकारमध्ये मागील काळात काम केले. यंदाही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून निवडून द्या असे आवाहन अमोल चिमणराव पाटील यांनी यावेळी केले.