पाचोरा, (प्रतिनिधी) : पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात कोट्यांवधी रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधांची विकास कामे आ. किशोर पाटील यांनी केलेली आहेत. अशा प्रकारे विकासाचे व्हिजन ठेवून काम करणाऱ्या नेत्याच्या मागे जनता असते. त्यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील तिसऱ्या टर्मसाठी निवडून येतील असा विश्वास खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला. पिंपळगाव येथे श्री गोविंद समर्थ महाराज मंदिरात किशोर पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील श्री गोविंद महाराज संस्थानचे मठाधिपती शिवानंद महाराज संस्थांनचे अध्यक्ष शामराव कृष्ण महाजन, सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तालुका प्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, डॉ शांतीलाल तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना खा. स्मिताताई यांनी भाजपा शिवसेना माहितीबद्दल बोलताना महायुती अभेद्य असून भाजपा बंडखोरी बाबत चर्चाना काहीही अर्थ नाही असे सांगितले. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे विशेषतः भाजपाचे सर्व कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या मागे भक्कमपणे उभे राहतील असे त्यांनी सांगितले.
हरेश्र्वर पिंपळगाव येथे आ. किशोर पाटील यांनी प्रचाराचा नारळ वाढवला..
राज्यातील महायुतीच्या लोक कल्याणकारी सरकारमुळे मतदार संघात रस्ते, वीज, पुल, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेची सर्व कामे केली असून जनतेच्या आशीर्वादाने विजय संपादन करणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पिंपळगाव हरेश्वर येथून त्यांनी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी श्री गोविंद समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना पुढच्या टर्ममध्ये शेत रस्त्यांचे प्रश्न सोडविणार असून एमआयडीसी व प्रक्रिया उद्योग उभरणार असल्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी खा. स्मिताताई वाघ, आ. किशोरआप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तालुकाप्रमुख सुनील पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,यांचेसह डॉ. शांतीलाल तेली, ज्ञानेश्वर सोनार, रमेश पोपट पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, वसंत गीते, विनोद महाजन, विनोद पाटील, नंदू पाटील, इंदल परदेशी, किशोर पाटील, दीपक,पाटील, डॉ.शेखर पाटील, डॉ नितीन चव्हाण, बंटी राठोड, रवी गीते, संतोष पाटील, किशोर उभाळे, दीपक माळी यासह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.