पारोळा, (प्रतिनिधी) : महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी शनिवारी दि. २ रोजी पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी विविध गावात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी नागरिकांनी अमोल पाटील यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी अमोल पाटील यांनी खडके खुर्द, खडके सिम, गणेश नगर, जवखेडे सिम, अंतुर्ली, तळई, उत्राण, हनुमंतखेडेसिम, बाह्मणे, निपाणी, आनंदनगर, ताडे, भातखेडा, पिंपरी सिम, गालापूर येथे प्रचार दौरा केला. विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देऊन अमोल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी जनतेला केले. ग्रामस्थांंच्या भेटी-गाठी घेत अमोल पाटील यांनी जेष्ठांकडुन शुभाशिर्वाद घेतले.