चाळीसगाव, (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांनी शनिवारी प्रचाराची सुरुवात शहरातील प्रसिद्ध फेमस टी हाऊस येथे भेट देऊन चहा पिऊन केली. या ठिकाणी चहा पिण्यास आलेल्या नागरिकांशी चर्चा करून महायुती उमेदवाराला विजयी करण्यासाठी आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी माघारीची अंतिम तारीख आहे. यानंतर दोन आठवडे प्रचार अजून जोर धरून वेग घेणार आहे. त्याआधी चाळीसगाव मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण हे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आवाहन करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे.
आ. मंगेश चव्हाण यांना तालुक्यातून प्रतिसाद मिळत असून विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी राहू असं नागरिक आमदार मंगेश चव्हाण यांना आश्वस्त करीत आहेत प्रचारामध्ये आ. मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभाताई चव्हाण या देखील सहभागी होत असून महिला वर्गाला सोबत घेऊन त्या मतदारांना साद घालीत आहेत.