भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील द्वारका नगर परिसरात तरूण विवाहित महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळात घडली. दरम्यान भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनेचा तपास करीत आहेत.
वर्षा अक्षय गुंजाळ (वय २२) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या द्वारकानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मागे त्यांच्या आजीकडे तात्पुरत्या रहिवासी म्हणून आलेल्या होत्या. मंगळवारी वर्षा गुंजाळ या घरी असताना दुपारच्या सुमारास वर्षा यांच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करून त्यांचा खून झाला. पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीनेच पत्नीचा खून केल्याची प्रथम दर्शनी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
या प्रकरणी मयत महिलेचे पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ (वय २६,रा. मुंबई) यांचे त्यांच्या पत्नीशी तिच्या आजी रंजना प्रकाश यशोदे यांच्या घरी वास्तव्यास असताना जोरदार कौटुंबिक वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा पुढील तपास करत आहे.