• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमोल चिमणराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मतदार संघातील नागरिकांचा रॅलीत उस्फुर्त प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 29, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमोल चिमणराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पारोळा / एरंडोल, (प्रतीनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी आराध्य दैवत व थोर महापुरुषांना वंदन करून आज अखेरच्या दिवशी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सर्वप्रथम शहरातील प्रमुख चौकातून रॅली काढण्यात आली. सकाळी १० वाजेपासुन शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, क्रांतिज्योती महात्मा फुले यांचा पुतळा, अमळनेर दरवाजा, श्री विठ्ठल मंदीर – पांडव वाडा, भोई गल्ली, जे.डी.सी.सी. बँक, भगवा चौक, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, श्री मरिमाता मंदीर, आर.टी. काबरे विद्यालय, धरणगांव चौफुली, बसस्थानक, वैष्णवी हॉटेल व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रॅलीचा समारोप झाला.

दरम्यान महायुतीची जाहीर सभा पार पडली. यात खासदार स्मिताताई वाघ, आ. मंगेश चव्हाण, आ. चिमणराव पाटील, भाजपा संघटनमंत्री किशोर काळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांनी आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना – भाजपा- राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे व संघटनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हाध्यक्ष, महायुतीचे समन्वयक, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विधानसभा प्रमुख, तालुकाप्रमुख, तालुकाध्यक्ष, उपतालुकाप्रमुख, उपतालुकाध्यक्ष, शहरप्रमुख, शहराध्यक्ष, उपशहरप्रमुख, उपशहराध्यक्ष, शहरसंघटक, तालुकासंघटक, जिल्हापरिषद, जिल्हा बँक, जिल्हा दुध संघ, पंचायत समिती, नगरपरिषद, बाजार समिती, शेतकी संघ, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शिक्षण संस्था यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना, भाजपा- राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
धारदार शस्त्राने वार करून विवाहितेचा खून, पतीवर संशय

धारदार शस्त्राने वार करून विवाहितेचा खून, पतीवर संशय

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group