• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुलाबराव पाटीलांचा ग्रामीण भागात प्रचार सुरू

मिरवणूकीत माता-भगिनींचे घेतले आशीर्वाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 29, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
गुलाबराव पाटीलांचा ग्रामीण भागात प्रचार सुरू

जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली आहे. भोकर-कानळदा जि.प.गटातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, कुवारखेडे व नांद्रा बु या गावांमध्ये सोमवारी प्रचार संपन्न झाला. या भागातील गावा-गावांमधील मतदार हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम पाठींबा दर्शवित असल्याचे चित्र दिसून आले.

गुलाबराव पाटील यांच्या भव्य अश्या प्रचार रॅलीत धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक निघत आहे. त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, रॉ. काँ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी धनुष्यबाणाचा झंझावाती प्रचार करीत आहे. शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीने कानळदा, आव्हाने, फूपनगरी, वडनगरी, आणि नांद्रा या गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. रॅलीत विविध ठिकाणी धनुष्यबाणाच्या प्रतीकांसह मोठे कट-आउट याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचेही कट-आउट रॅलीत ठिकठिकाणी बघायला मिळाले.

प्रत्येक गावात औक्षण, फटाक्यांच्या धूमधडाक्यात व ढोल-ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून प्रचाराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. प्रत्येक गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने प्रचाराला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होत आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी गावागावांमध्ये ठिकठिकाणी बैठका घेतल्या, ज्यात त्यांनी लोकांशी थेट संवाद साधून त्यांची जनसंपर्क मोहीम इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत वेगळी ठरत आहे.

जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उप जिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, संजय भोळे, गोपाळ भंगाळे, संजय पाटील, सरपंच भगवान पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, मा. जि. प. सदस्य विलास सोनवणे, पवन सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, मच्छिंद्र पाटील, मुरलीधर पाटील, विजू सपकाळे, दिलीप आगीवाल, निलेश वाघ, जितू अत्रे, श्यामकांत जाधव, वसंतराव भालेराव, अशोक सपकाळे, मनोहर पाटील, संदीप पाटील, सुरेश शामराव, अशोक पाटील, दगडू चौधरी, रमेश पाटील, दिलीप जगताप, बळीराम पाटील, विलास सोनवणे, राजू पाटील, राजू सोनवणे, यांच्यासह कानळदा-भोकर जिल्हा परिषद गटातील सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना- रिपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: #political
Next Post
अमोल चिमणराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमोल चिमणराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group