# Khandesh Prabhat | खान्देश प्रभात > डिजीटल युगाचं, निर्भीड व्यासपीठ ## Posts - [शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना](https://khandeshprabhat.com/16234/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर उत्साही झाला होता. ​याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता” या विषयावर सविस्तर माहिती दिली. “बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारख्या पत्रांच्या […] - [महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!](https://khandeshprabhat.com/16231/): ​शिवाजीनगर परिसरातील नागरिक त्रस्त; वारंवार तक्रारी करूनही अधिकारी सुस्त जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर परिसरातील विविध वसाहतींमध्ये पथदिव्यांचा खेळखंडोबा सुरू असून, दिवसा दिवे सुरू राहिल्याने विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तर दुसरीकडे अनेक भागात रात्री पथदिवे बंद राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराबाबत अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर अहमद खान यांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ​शिवाजीनगर अंतर्गत येणाऱ्या दत्त कॉलनी, उमर कॉलनी, टीचर कॉलनी, रेल्वे पूल आणि चिसतीया कॉलनी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे २४ तास सुरू आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असतानाच, दुसरीकडे काही भागांत रात्री पथदिवे बंद […] - [जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!](https://khandeshprabhat.com/16228/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : तक्रारी अर्जावर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती १ लाख रुपये स्वीकारताना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ​जळगाव येथील एका तक्रारदाराच्या मुलांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारी अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (वय ४०) यांच्याकडे होती. या अर्जात तक्रारदाराच्या मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी अहिरे यांनी सुरुवातीला २,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ​एसीबीचा सापळा आणि कारवाई.. लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने १३ एप्रिल […] - [पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना](https://khandeshprabhat.com/16225/): जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना सिमेंट भरताना बांधकाम धसल्याने, तोल जाऊन पडल्यामुळे ३२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश गोकुळ सोनार (रा. तानाजी मालुसरे नगर,असोदा रोड जळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे. मास्टर कॉलनीतील शेरा चौकात साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ठेकेदार सुरेश मिस्तरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश सोनार हे विशाल चव्हाण आणि सुनील सपकाळे या इतर दोन मजूरांसोबत पाचव्या मजल्यावरील लिंटर माळाचे काम करत होते. त्या ठिकाणी सिमेंट भरत असताना अचानक बांधकाम […] - [आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!](https://khandeshprabhat.com/16220/): जळगाव, (प्रतिनिधी) : “भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली आहे. त्यांच्या सुरांनी केवळ कान तृप्त केले नाहीत, तर अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले. त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला,” अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ​निसर्ग आणि स्वरांचे अतुट नाते.. आशाताईंच्या कार्याचा गौरव करताना अशोक जैन म्हणाले की, कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही रसिकांना अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला. जणू […] - ['समन्वय २०२६' चा दिमाखात शुभारंभ; 'इन्फाईनाइट हॉरीझन' थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती](https://khandeshprabhat.com/16214/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘आग्नेय’ बॅचतर्फे आयोजित ‘समन्वय २०२६’ या वार्षिक सांस्कृतिक सप्ताहाचा प्रारंभ उत्साहात झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवत विविध मनमोहक कलाविष्कार साकारले. ​मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आणि डॉ. विजय बाविस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​’इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर आधारित […] - ['मनपा शाळा, शहराचा अभिमान'; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा](https://khandeshprabhat.com/16211/): जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवारी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या दालनात सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शाळांची सद्यस्थिती, पटसंख्या वाढवणे आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल, यावर उपमहापौरांनी विशेष मार्गदर्शन केले. पालकांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही जळगाव शहराचे नाव उज्ज्वल व्हावे, […] - [जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती](https://khandeshprabhat.com/16207/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप गावीत यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश शुक्रवारी (१० एप्रिल) निर्गमित झाले असून, गावीत लवकरच आपला पदभार स्वीकारतील. ​संदीप गावीत हे यापूर्वी भुसावळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती जाहीर झाली असली तरी नियुक्तीचे आदेश प्रलंबित असल्याने ते काही काळ प्रतीक्षेत होते. अखेर काल यावर शिक्कामोर्तब झाले. ​सध्या या पदावर असलेले अशोक नखाते यांच्या पुढील नियुक्तीचे आदेश अद्याप आलेले नाहीत, त्यामुळे ते सध्या वेटिंगवर (प्रतीक्षेत) आहेत. संदीप गावीत आता जळगाव जिल्ह्याचे नवीन अपर पोलीस […] - [जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू](https://khandeshprabhat.com/16204/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहराच्या स्वच्छतेबाबत वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा न करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन कंपनीला जळगाव महानगरपालिकेने अखेर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांतील ही पहिलीच अधिकृत नोटीस असल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ​वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष.. ​जळगाव शहर हद्दीतील कचरा संकलनाचे काम संबंधित कंपनीकडून समाधानकारक होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. उपमहापौर मनोज चौधरी यांनी यापूर्वी अनेकदा संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना आणि महापालिका प्रशासनाला प्रत्यक्ष सूचना देऊन कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर कोणताही […] - [रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध](https://khandeshprabhat.com/16201/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : एलपीजी गॅसची झालेली प्रचंड दरवाढ, कृत्रिम टंचाई आणि रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची जाचक नोंदणी फी यांविरुद्ध बुधवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी जोरदार निदर्शने केली. ‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने पुकारलेल्या या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत जळगावात हे यशस्वी आंदोलन करण्यात आले. ​यावेळी मागण्यांचे लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांना देण्यात आले. मागण्यांचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात बेमुदत बंद पुकारून ‘चक्का जाम’ केला जाईल, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी दिला आहे. ​गॅस वितरकांकडून लूट: ५५ रुपयांचा […] - [सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग](https://khandeshprabhat.com/16196/): जळगाव, (प्रतिनिधी) : जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी, जैन ॲग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी ‘विश्वनवकार महामंत्र दिन’ सामुहिकपणे मंत्र जपत उत्साहात संपन्न केला. सकाळी नियोजित वेळेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या विविध प्रकल्प परिसरात सामूहिक नवकार महामंत्र जप करण्यात आला. यामध्ये अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरण निर्माण केले. जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट, जैन ॲग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथे शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक जप करण्यात आला. यावेळी शांत, एकाग्र आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. सहभागी सर्वांनी सामूहिक प्रार्थना करीत अहिंसा आणि विश्वशांतीचा संकल्प घेतला. या नमस्कार महामंत्राद्वारे […] - [जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा](https://khandeshprabhat.com/16193/): जळगाव, (प्रतिनिधी) : सकल ब्राह्मण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक असलेला भगवान श्री परशुराम जन्मोत्सव यंदा जळगावात सलग १७ व्या वर्षी अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत येत्या रविवार, १२ एप्रिल रोजी विराट मोटारसायकल रॅली आणि रविवार, १९ एप्रिल रोजी मुख्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. “प्रत्येकाने स्वतः परशुराम दूत बनून या सोहळ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केले. ​नवी पेठ येथील हनुमान मंदिरात आयोजित या पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष नितीन पारगावकर, सहसचिव पंकज पवनीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ​जन्मोत्सवाच्या मुख्य सोहळ्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी […] - [गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन](https://khandeshprabhat.com/16186/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला एलपीजी इंधनाचा तुटवडा आणि त्याचा गैरफायदा घेऊन सुरू असलेली चढ्या दराने विक्री, तसेच महाराष्ट्र शासनाकडून कल्याणकारी मंडळाच्या नावे होणारी सक्तीची वसुली या विरोधात जळगाव जिल्ह्यातील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. ‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनामागची प्रमुख कारणे: ▪️​इंधन दरवाढ व काळाबाजार: शहरातील एलपीजी गॅस वितरक प्रति लिटर ११० ते १५० रुपये या चढ्या दराने विक्री करत असून, रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसत आहे. ५५ रुपये दराने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे. […] - [दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई](https://khandeshprabhat.com/16183/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण सखाराम अहिरे (वय ३८, रा. तांबापुरा) यांनी आपली हिरो होंडा स्लेंडर गाडी (क्र. MH 28 G 3256) घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. ३ एप्रिलच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास लावलेली ही गाडी ४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस […] - [जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश](https://khandeshprabhat.com/16180/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव पंचायत समितीमध्ये खासदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. ​या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, ॲडिशनल बीडीओ योगिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. ​महत्त्वाचे मुद्दे व निर्देश: ▪️​घरकुल योजना: अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यावर, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून हप्ते वितरित करावेत, असे कडक निर्देश देण्यात आले. ▪️​योजनांची अंमलबजावणी: समाजकल्याण, महिला […] - [गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्यांचे काम रखडले; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपोषणाचा इशारा](https://khandeshprabhat.com/16177/): जळगाव, (प्रतिनिधी) : गिरणा नदीवरील प्रस्तावित सात बंधाऱ्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्षा कल्पिता रमेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, हे काम त्वरित सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ​जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, गिरणा धरणाखालील १६८ किलोमीटरच्या परिसरात ५० ते ६० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सात साखळी बंधारे बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीची दखल घेत राज्यपालांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पाला नवीन प्रकल्प म्हणून मान्यता […] - [३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात 'ऐनक प्लस' या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!](https://khandeshprabhat.com/16169/): जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील नामांकित‎ गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन‎ ‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎ अत्याधुनिक सेवेसह‎ जळगावकरांच्या सेवेत येणार आहे. रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३० वर्षापासून होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक‎ प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या ‎मशीनने ग्राहकांसाठी ‎मोफत‎ नेत्र तपासणीची सोय‎ देखील उपलब्ध आहे.‎ ब्रँडेड फ्रेम्स,‎ गॉगल्स, लेन्सेस उपलब्ध.. ‘ऐनक‎ प्लस’मध्ये रेबैन, ओकले, जग्वार, वॉग, फ़ास्ट ट्रॅक, वुल्फ आईज, पोलोराईड, इंसिस्ट, फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स,‎ […] - [फायर स्टेशनला समस्यांचा विळखा; उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून अचानक पाहणीत पोलखोल](https://khandeshprabhat.com/16166/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आपत्कालीन सेवा किती ‘सावध’ आहेत, याचा प्रत्यय शुक्रवारी सकाळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केलेल्या अचानक पाहणीतून समोर आला. आयुक्त बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या फायर स्टेशनची दुरवस्था पाहून उपमहापौरांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. “आयुक्तांचा बंगला केवळ १० मीटरवर असतानाही त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ​उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी सकाळी आयुक्त बंगल्यालगत असलेल्या फायर स्टेशनला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना तिथे अनेक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले. अग्निशमन दलासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचा लँडलाईन फोन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क कसा साधायचा, असा […] - [कुरिअरचे पार्सल चोरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; ९६ हजारांचे ४ मोबाईल हस्तगत](https://khandeshprabhat.com/16162/): जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आकाशवाणी चौकातील एका ट्रॅव्हल्स ऑफिससमोरून कुरिअरचे बॉक्स चोरी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला (अल्पवयीन मुलगा) जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ९६ हजार ९९६ रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ४ महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. ​आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून ५ मोबाईल असलेले कुरिअरचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तपास पथक तयार केले होते. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एका अल्पवयीन मुलावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने चोरीची […] - [शहर पोलीस शोध पथकाची मोठी कारवाई; दोन घरफोडींचे गुन्हे उघड, तीन अट्टल चोरटे जेरबंद](https://khandeshprabhat.com/16159/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेंदालाल मिल परिसरातून तीन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ​दिनांक २३ ते २५ मार्च दरम्यान गेंदालाल मिल भागातील शेख रईस शेख यांच्या घरातून १०,४०० रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी १) आदील शेख मजीद, २) गुफरान शेख करीम, आणि ३) कासिम सैय्यद अली (सर्व रा. गेंदालाल मिल) यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. […] - [माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी लिनेस क्लबचा ‘शितल’ आधार](https://khandeshprabhat.com/16156/): जळगाव, (प्रतिनिधी ) : “भारत माता की जय” चा जयघोष करणाऱ्या आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीर सैनिकांच्या कुटुंबियांची व मुलांची सेवा करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशा भावना लिनेस क्लब जळगावच्या अध्यक्षा रेखा वर्मा यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते, लिनेस क्लबतर्फे माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाला देण्यात आलेल्या ८० लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक वॉटर कुलरच्या भेट कार्यक्रमाचे. ​‘त्याग त्यांचा, सेवा आमची’ या ब्रीदवाक्याला जागत लिनेस क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुनील रायसोनी यांच्यातर्फे आणि विजूताई बाफना यांच्या विशेष सहकार्यातून हे वॉटर कुलर वसतिगृहाला प्राप्त झाले आहे. वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, […] - [धानोरा नगरीत भक्तीचा शंखनाद; २० एकर परिसरात रंगणार 'महाविष्णू याग' अन् 'दशावतार मूर्ती' प्राणप्रतिष्ठा सोहळा!](https://khandeshprabhat.com/16153/): ​चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथे आगामी एप्रिल महिन्यात अध्यात्म आणि भक्तीचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. सकल हिंदू समाज आणि सतपंथ ज्योत मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री महाविष्णू याग, श्री दशावतार मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि भव्य धर्म संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण धानोरा नगरी भक्तिमय झाली असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. ​२० एकर जागेत सोहळ्याची भव्यता.. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जागेची अडचण ग्रामस्थांच्या दातृत्वातून सुटली आहे. सूर्यवंशी गुजर समाज मंदिरासमोरील सुमारे २० एकर विस्तीर्ण जागेत हा सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक शेतकरी बांधवांनी ही जागा कोणत्याही शुल्काशिवाय या धार्मिक कार्यासाठी उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी […] - [सिल्लोडच्या दोन तरुणांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई](https://khandeshprabhat.com/16150/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ​कुसुंबा-एअरपोर्ट रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. ​पोलीस पथकाने २८ मार्च २०२६ रोजी एअरपोर्टजवळील ‘तारा बिझनेस पार्क’ परिसरात सापळा रचला. यावेळी एका दुचाकीवर दोन संशयित तरुण येताना […] - [मैदानावर पत्रकार भिडले! 'प्रेस फोटोग्राफर' संघाने कोरले विजेतेपदावर नाव](https://khandeshprabhat.com/16147/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : समाजाच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धावणाऱ्या पत्रकारांच्या मनगटातील जोर आणि खेळाडूवृत्तीचा प्रत्यय जळगावकरांना नुकताच आला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ‘पत्रकार प्रीमियर लीग’ पर्व-२ च्या अंतिम सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत जळगाव प्रिंट मीडिया संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर प्रेस एडिटर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. ​२४ संघांचा सहभाग आणि अटीतटीचे सामने.. जळगावच्या सागर पार्क मैदानावर २६ ते २९ मार्च दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील तालुकानिहाय १४ संघ आणि जळगाव शहरातून संपादक, लोकप्रतिनिधी, प्रशासन, डॉक्टर व पोलीस अशा एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला होता. या सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा उच्चांक पाहायला मिळाला. […] - [जिल्हा परिषदेतर्फे ३४६ दिव्यांग विद्यार्थ्यांना ५३ लाखांच्या कर्णयंत्रांचे वाटप](https://khandeshprabhat.com/16142/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगावच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘जि.प. सेस २०२५-२६’ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३४६ विद्यार्थ्यांना एकूण ६९२ उच्च दर्जाच्या कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले असून, या योजनेसाठी ५३ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ​जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, […] - [क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!](https://khandeshprabhat.com/16137/): जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगणार आहे. प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९ वर्षाखालील गटातील तब्बल १५६ खेळाडूंवर ऑक्शनमध्ये बोली लागली. यावेळी ऑलराऊंडर खेळाडूंसाठी फ्रॅचायझींमध्ये तुफान चढाओढ पाहायला मिळाली. क्रिकेटप्रेमींसाठी ही लीग एक रोमांचक पर्व ठरणार असून प्रत्येक संघाने ऑलराऊंडर खेळाडूंवर आपली पर्स पॉकेट आजमावून संघ भक्कम केला आहे. ऑक्शननंतर संघांची रचना जाहीर झाली असून प्रत्येक संघात दमदार खेळाडूंचा समावेश आहे. जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये तांत्रिक बाजू अभंग जैन, जगदीश चावला, वरूण देशपांडे, हितेश पटेल, समीर गुळवे, उदय सोनवणे, संदीप गांर्गुेळे, सुयश बुरूकूल, प्रशांत विरकर […] - [ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!](https://khandeshprabhat.com/16134/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री यांच्याहस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. ​भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रशासनात ‘Ease of Living’ आणि ‘Ease of Working’ ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्ह्याने ई-ऑफीसचा १००% वापर, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर […] - [जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न](https://khandeshprabhat.com/16131/): जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20 पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली. ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला. प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लीग- २०२६ पर्व-२ चे ‘ऑक्शन’ जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे […] - [दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त](https://khandeshprabhat.com/16128/): जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच, जिल्हापेठ पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास चक्र फिरवून दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीची एक होंडा ड्रीम मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ​जळगाव नवीन बसस्थानक परिसरातून एक मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये २० जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. ​​जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपी आकाश राजू खरे (रा. नांद्रा ता. पाचोरा, ह.मु. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश प्रकाश भिल […] - [मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा](https://khandeshprabhat.com/16125/): जळगाव, (प्रतिनिधी) : मोहफुलांकडे केवळ दारू निर्मितीचे साधन म्हणून न पाहता, त्यापासून पौष्टिक पदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ​यावेळी व्यासपीठावर सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतिश गोगुलवार, रोटरीचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, सचिव सुभाष अमळनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, मोहफुलांचे लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेस ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग घेतला […] - ['जय श्रीराम'च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!](https://khandeshprabhat.com/16122/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून जळगाव शहरात गुरुवारी (दि.२६) भक्ती आणि उत्साहाचा महापूर ओसांडून वाहिला. ‘सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती, जळगाव महानगर’ तर्फे आयोजित भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी ‘राममय’ झाली होती. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमले होते, तर ढोल-ताशांच्या गजराने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. ​महाआरतीने सोहळ्याचा शंखनाद.. ​शोभायात्रेचा प्रारंभ गोलाणी मार्केट येथील हनुमान मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम आणि हनुमान रायाची महाआरती करण्यात आली. आरतीनंतर ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि शंखनादात शोभायात्रेला सुरुवात झाली. गोलाणी मार्केटपासून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होताना ठिकठिकाणी भाविकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. ​वेशभूषा […] - [खून प्रकरणातील 'मोस्ट वाँटेड' आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत](https://khandeshprabhat.com/16118/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून, आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि आठ तलवारी अशी घातक शस्त्रे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या आहेत. ​रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी धीरज कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका विशेष पथकाने आर.आर. शाळेच्या बाजूला असलेल्या गल्लीत सापळा रचला. ​ ​पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या धीरज कोळी […] - [बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन](https://khandeshprabhat.com/16115/): नवी मुंबई : वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात संपन्न झालेल्या ‘बाल मराठी संमेलना’च्या मुख्य रंगमंचावर जळगाव येथील श्रेयस प्रकाशनातर्फे महत्वपूर्ण बालसाहित्याचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात पुणे आणि अहिल्यानगर येथील साहित्यिकांच्या बालनाटकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. हा प्रकाशन सोहळा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्रेयस प्रकाशनाचे प्रकाशक योगेश शुक्ल उपस्थित होते. याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेची मध्यवर्ती कार्यकारिणी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्ञानेश्वर गायकवाड (पुणे): यांच्या ‘गाऱ्हाणं’ आणि फुलपाखराची गोष्ट या बालनाट्य पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांच्या अनुपस्थितीत पुण्याच्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजली धारू यांनी त्यांचे प्रतिनिधीत्व केले. तसेच अनंत जोशी […] - [नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद](https://khandeshprabhat.com/16112/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये राबविण्यात येत असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नशिराबाद पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी दोन गावठी कट्ट्यांसह रंगेहात अटक केली आहे. ​दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. वरची अळी, नशिराबाद) हा गावठी कट्टा घेऊन बस स्थानक परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. ​मिळालेल्या माहितीची शहानिशा करून सपोनि […] - [चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी](https://khandeshprabhat.com/16109/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : पोहता येत नसतानाही नदीच्या पात्रात मृत्यूशी झुंज देणाऱ्या चार मुलांसाठी १४ वर्षीय उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील हा प्रत्यक्ष ‘देवदूत’ ठरला. ओमने दाखवलेल्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार अल्पवयीन मुले (वय १६) अनेर नदीत स्नानासाठी उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने ही चौघेही बुडू लागली. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या ओम पाटील याने क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या डोहात उडी घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने एकामागून एक अशा […] - [इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!](https://khandeshprabhat.com/16106/): जळगाव, (प्रतिनिधी) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ ची निवडणूक उद्या (दि.२४ मार्च) पार पडणार असून जळगाव शहरातून यंदा दोन उमेदवार मैदानात उतरले आहेत. ॲड. गुलाबसिंग मानसिंग पाटील आणि ॲड. रेखा घनश्याम कोचुरे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे ॲड. रेखा घनश्याम कोचुरे या जळगाव शहरातून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीत उतरणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. यापूर्वी ॲड. एल. एल. बेंडाळे, ॲड. भरत देशमुख आदींनी प्रतिनिधित्व केले असले, तरी जळगाव न्यायालयातून महिला उमेदवार कधीच समोर आली नव्हती. या निवडणुकीत एकूण २३ सदस्यांची निवड होणार असून त्यात ५ महिलांसाठी जागा राखीव आहेत. तसेच […] - [महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी 'अग्निशिखा' ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव](https://khandeshprabhat.com/16102/): ​आरोग्य, सुरक्षा आणि व्यसनमुक्तीचा त्रिवेणी संगम; जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा होणार ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने गौरव ​जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित ‘अग्निशिखा महिला ग्रुप’ तर्फे जळगाव शहरात महिलांसाठी एका विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ मार्च रोजी जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ​तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रबोधन.. महिलांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर या कार्यक्रमात प्रकाश टाकला जाणार आहे. यात प्रामुख्याने ​महिलांच्या आरोग्याशी संबंधित मासिक पाळी व इतर समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. तसेच […] - [जळगावमध्ये क्रिकेट फिव्हर! 'जेसीएल-२०२६' च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा](https://khandeshprabhat.com/16099/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) धर्तीवर जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) २०२६ – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जळगावसह संपूर्ण खान्देशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केली. ​यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आणि ॲड. सुरज जहागीर यांची प्रमुख उपस्थिती होती. ​ ​मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ च्या अद्ययावत क्रीडांगणावर ही स्पर्धा पार […] - [कौटुंबिक वाद: पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या](https://khandeshprabhat.com/16096/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निमखेडी येथे गुरुवारी दुपारी एक थरारक उडवणारी घटना घडली असून, कौटुंबिक वादाचे पर्यावसान हत्येत झाले आहे. एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, तीन लहान मुले पोरकी झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी परिसरात राहणारे नितीन सोनवणे (३५) आणि त्यांची पत्नी दीपाली सोनवणे (२८) हे दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी १९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरात कोणीही नसताना पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात नितीनने दीपालीच्या पोटावर विळ्याने आणि डोक्यावर इतर धारदार शस्त्राने […] - [पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी](https://khandeshprabhat.com/16093/): ​पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील बायपास रोडवर आज दुपारी एका भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोलला जोरदार धडक देऊन पलटी झाल्याची भीषण घटना घडली. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. आज दि. १९ मार्च रोजी दुपारी ११:३० ते १२ च्या सुमारास भडगाव बाजूकडून पहूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक MH 19 CX 4699) पाचोरा बायपासवरून जात होता. यावेळी विकास कॉलनीकडून अचानक एक मोटारसायकलस्वार ट्रकसमोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकचा वेग जास्त असल्याने तो थेट दुभाजकावरील (डिव्हायडर) इलेक्ट्रिक पोलला धडकून विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. हा ट्रक ऑईलने भरलेला होता. अपघात […] - [पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन](https://khandeshprabhat.com/16090/): ​पाचोरा, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि तालुक्यात फोफावलेला गॅसचा काळाबाजार याविरोधात पाचोरा तालुका काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना प्रशासनाने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. ​महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली. ​आंदोलकांनी तहसीलदार विजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, दुसरीकडे गॅस सिलिंडरची अवैध विक्री आणि काळाबाजार मोठ्या प्रमाणावर […] - [भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://khandeshprabhat.com/16087/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या पावन पर्वानिमित्त मेहरूण येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात हिंदू जनजागृती समितीतर्फे सामूहिक गुढी उभारण्याचा भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि मांगल्याच्या वातावरणाने न्हाऊन निघाला होता. ​कार्यक्रमाचा प्रारंभ माजी नगरसेवक प्रशांत नाईक व अर्चना प्रशांत नाईक यांच्या शुभहस्ते गुढीपूजन करून करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने आणि शास्त्रोक्त विधीनुसार गुढी उभारल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ​याप्रसंगी मार्गदर्शन करताना घनश्याम दहिवदकर यांनी सामूहिक गुढीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, “अशा उपक्रमांमुळे समाजात केवळ धार्मिक जागृतीच होत नाही, तर एकात्मतेची भावना देखील दृढ […] - [अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद](https://khandeshprabhat.com/16084/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर येथील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून भरदिवसा ५ लाख २७ हजार रुपये लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धुळे येथील एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून दीड लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ​दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:४५ च्या सुमारास अमळनेर येथील ‘लामा जिनिंग’चे मालक यतिन विनोद कोठारी हे आपल्या दुचाकीवरून ५ लाख २७ हजार रुपयांची रोकड घेऊन जात होते. पिंपळे रोडवर तिघा अज्ञात इसमांनी त्यांना अडवून, डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांच्याकडील बॅग जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी अमळनेर […] - ['चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया'! ; मुनोत परिवारातर्फे मोफत 'जलकुंड' आणि 'परळ' वाटप उपक्रम](https://khandeshprabhat.com/16081/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : मार्च महिन्यातच जळगावचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. या भीषण उष्णतेचा सर्वाधिक फटका रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि पशू-पक्ष्यांना बसत असून, पाण्यासाठी त्यांची भटकंती होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रमेशकुमार मुनोत यांनी भूतदयेच्या भावनेतून जलकुंड आणि परळ मोफत वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ​पाण्याची सोय आणि सावलीचीही काळजी.. ​या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात एकूण १५० जलकुंड आणि ५० परळ मोफत वितरित केले जाणार आहेत. केवळ पाणी उपलब्ध करून देऊन न थांबता, रमेशकुमार मुनोत यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे […] - [जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक](https://khandeshprabhat.com/16078/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी जादा रकमेची मागणी करून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका अधिकृत स्टॅम्प वेंडरसह त्याच्या भावाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई १७ मार्च २०२६ रोजी करण्यात आली असून, या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला ५०० रुपये दराचे १० स्टॅम्प पेपर हवे होते. शासकीय नियमानुसार त्याची एकूण किंमत ५,००० रुपये होणे अपेक्षित होते. मात्र, पाचोरा येथील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स सेंटरचे अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) यांनी तक्रारदाराकडे ५,५०० रुपयांची मागणी केली. म्हणजेच प्रत्येक स्टॅम्पमागे ५० रुपये याप्रमाणे एकूण ५०० रुपये अधिकची […] - [स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त](https://khandeshprabhat.com/16075/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ​दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव शहरातील भानू हॉटेल परिसरातून कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी यांची ‘हिरो स्प्लेंडर’ (एमएच १९ बीवाय ७४१३) चोरीला गेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. ​ ​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय […] - [कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन](https://khandeshprabhat.com/16070/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : “महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली कामे कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार व प्रामाणिकपणे करावीत. नियमबाह्य कामांसाठी कोणी दबाव आणत असल्यास ती बाब तत्काळ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत,” असे आश्वासन उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी दिले. जळगाव महानगरपालिकेत आयोजित ‘कर्मचारी संवाद’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ​या प्रसंगी व्यासपीठावर उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, मुख्य लेखाधिकारी विजयकुमार सोनवणे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या संवाद कार्यक्रमात कैलास चौधरी, गौरव सपकाळे, समीर बोरोले, सुजाता पाटील यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने स्थायित्व […] - [मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई](https://khandeshprabhat.com/16067/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मालेगाव येथील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या दोन महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ​दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगावच्या नवीन बसस्थानक परिसरातून एक मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. ​जिल्हापेठ पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मालेगाव येथील संशयितांचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक, अबुबकर […] - [जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’](https://khandeshprabhat.com/16064/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी ‘कर्मचारी संवाद व जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उद्या, सोमवार दि. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मनपा सभागृहात पार पडणार आहे. ​महानगरपालिकेच्या शहर विकासात कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा असतो. मात्र, अनेकदा कामाचा अतिरिक्त ताण, सोयी-सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. विशेषतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा बोजा टाकणे आणि कामचुकारांना अभय मिळणे, अशा तक्रारी कर्मचारी वर्गातून केल्या जातात. या सर्व समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी हा दरबार भरवण्यात येत आहे. ​या उपक्रमात सर्व […] - [नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या](https://khandeshprabhat.com/16061/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन नराधम नातेवाईकांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला तातडीने अटक केली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर १३ मार्चच्या रात्री ११:३० ते १४ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास हा घृणास्पद प्रकार घडला. पीडितेचे नातेवाईक असलेल्या दोन आरोपींनी तिला गाठले. यावेळी मुख्य आरोपी राजेश शिवराम पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पाजले. पेय प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. याच स्थितीचा फायदा घेत राजेश पवार आणि त्याचा साथीदार राजेंद्र शंकरसिंह पवार […] - [पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी](https://khandeshprabhat.com/16057/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात शनिवारी दुपारी राजकीय वर्चस्व आणि गटार कामाच्या ठेक्यावरून दोन गटांत मोठा संघर्ष पाहायला मिळाला. माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिंदे गटाचे समर्थक राहुल ऊर्फ मोगली ठाकरे यांचे कुटुंबीय एकमेकांना भिडल्याने रिधूरवाडा परिसरात तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, या वादाचा दुसरा अंक थेट पोलीस ठाण्यात पार पडला, जिथे दोन्ही गट आपापसात भिडल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. ​राजकीय वैमनस्याची पार्श्वभूमी.. ​या वादाची मुळे महापालिका निवडणुकीपर्यंत जातात. प्रभाग क्रमांक ३ मधून कैलास सोनवणे यांची मुलगी आणि राहुल ठाकरे यांची पत्नी समोरासमोर होत्या. या अटीतटीच्या लढतीत ठाकरे यांच्या पत्नीचा निसटता पराभव झाला होता. तेव्हापासून या […] - [प्रकाश तेली यांच्या 'शाश्वत विचार' ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन](https://khandeshprabhat.com/16053/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : लेखक व पत्रकार प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ या २० व्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि पर्यावरणवादी पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते जळगाव येथे एका घरगुती व साध्या कार्यक्रमात या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. ​यावेळी अनिल पाटील, लेखक प्रकाश तेली, योगिता तेली, ॲड. किरण तेली, आर्यन तेली व आर्या तेली उपस्थित होते. ​ग्रंथ प्रकाशनानंतर बोलताना पद्मश्री चैत्राम पवार यांनी प्रकाश तेली यांच्या साहित्यिक प्रवासाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “प्रकाश तेली यांचे साहित्य कार्य अत्यंत आगळेवेगळे असून ते मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहे. समाजाला आज अशाच सकारात्मक साहित्याची […] - [कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!](https://khandeshprabhat.com/16050/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : “जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर बनवणे हे आपले प्राथमिक ध्येय आहे. स्वच्छता कामात कुठल्याही प्रकारचा नियमभंग, कर्मचाऱ्यांची खोटी हजेरी किंवा कामातील हलगर्जीपणा यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिला आहे. ​शुक्रवारी महापालिकेतील उपमहापौर दालनात आरोग्य विभागाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमहापौरांनी सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, युनिट प्रमुख आणि स्वच्छता निरीक्षक यांना कामात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत उपमहापौरांनी प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बोट ठेवले. “कामगारांची हजेरी आता मुकादमांनी न घेता स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः घ्यावी. यामुळे बोगस हजेरीला चाप बसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, […] - [अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; 'पोक्सो'अंतर्गत कारवाई](https://khandeshprabhat.com/16047/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे येथील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील हुजेफ युनूस पिंजारी (वय १९) याने जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ त्याने एका खासगी क्लासचे स्वच्छतागृह आणि शहरातील एका हॉटेलच्या रूममध्ये तयार केले होते. ​नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. संशयित आरोपी हुजेफ हा संबंधित विद्यार्थिनीला तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सातत्याने धमकी […] - [जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत](https://khandeshprabhat.com/16044/): जळगाव, (प्रतिनिधी) : वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, त्यातून होणारा आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच आपसातील सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभर एकाच दिवशी दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी दिली आहे. मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही लोक अदालत आयोजित करण्यात येत आहे. विधी सेवा प्राधिकरणव जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात अध्यक्ष, जिल्हा […] - [नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'पीएच.डी.'](https://khandeshprabhat.com/16041/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) नुकताच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये नितीन मिठाराम पाटील यांना वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत ‘उत्पादन व्यवस्थापन’ विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ​नितीन पाटील यांनी आपले संशोधन “एमएसएमईच्या ऑपरेशनल कामगिरीमध्ये वाढ करण्यासाठी लीन पद्धतीची प्रभावीता” (Effectiveness of Lean Tools for Enhancing Operational Performance of MSMEs) या विषयावर पूर्ण केले. त्यांनी आपले हे संशोधन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (पुणे) येथील संशोधन केंद्रात, डॉ. योगेश वासुदेव भोवते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ​विद्यापीठाच्या नियमावलीनुसार अत्यंत यशस्वीरीत्या आपला प्रबंध सादर केल्याबद्दल त्यांना ही पदवी जाहीर करण्यात आली […] - [महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा](https://khandeshprabhat.com/16038/): ​मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील वातावरणात सध्या मोठे बदल पाहायला मिळत असून, पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध भागात संमिश्र हवामानाचा अनुभव येणार आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ मार्च ते १७ मार्च दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ​पावसाचा अंदाज (१३ ते १७ मार्च) मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी वगळता, उर्वरित महाराष्ट्रात या पाच दिवसांत ढगाळ वातावरण राहील. काही मोजक्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः १५ आणि १६ मार्च रोजी पावसाचा जोर वाढू शकतो. या दोन दिवसांत खालील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह किरकोळ पावसाचा अंदाज आहे: ​विदर्भ आणि मराठवाडा (संपूर्ण विभाग) ​उत्तर आणि पश्चिम […] - [घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन](https://khandeshprabhat.com/16035/): जळगाव, (जिमाका) : सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, स्थानिक स्तरावर घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे. नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे […] - [विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम](https://khandeshprabhat.com/16029/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सुप्त कलागुणांना आणि क्रीडावृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (१० मार्च) सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे विविध स्पर्धांचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जळगाव शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ​कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सीमा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटन सत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा मंगला नगरकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अंजली पाटील यांनी केले, तर देवानंदा साखला यांनी सूत्रसंचालन केले. ​विविध विषयांवरील स्पर्धांनी वेधले लक्ष.. यावेळी वकृत्व, […] - [दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण](https://khandeshprabhat.com/16026/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव पोलीस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपावरील १ कोटी ३३ लाख रुपयांच्या बहुचर्चित अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, व्यवस्थापक तथा पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर सोमवारी (९ मार्च) पोलिसांना शरण आले. पोलिसांनी वाघ यांच्यासह त्यांचा मुलगा शेखर वाघ यालाही अटक केली असून, या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ​जळगाव पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत ‘दक्षता’ पेट्रोल पंप चालविला जातो. या पंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. ऑडिट दरम्यान पंपाच्या खात्यात १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांची तफावत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी वाघ यांच्याविरुद्ध फसवणूक […] - [जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ](https://khandeshprabhat.com/16023/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सदस्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव सी.ए. शाखेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत भुसावळ व जळगाव येथे नवीन वाचन कक्षांचे उद्घाटन आणि जळगाव येथील आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरण कार्याचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला. ​यात भुसावळ येथे २५ आसनक्षमतेच्या वाचन कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. तर जळगाव येथील के.सी.ई. सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयात ३५ आसनक्षमतेच्या अतिरिक्त वाचन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हे दोन्ही कक्ष वातानुकूलित असून, यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे. ​वाचन कक्षांच्या उद्घाटनासोबतच जळगाव येथील आय.सी.ए.आय. भवन येथे इमारत नूतनीकरण व […] - [विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार 'कातकरी नृत्य'](https://khandeshprabhat.com/16020/): जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला जगभरातून १९ देशातील मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदतर्फे अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिंनींनी सहभाग घेत बहारदार कातकरी नृत्य सादर केले. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या विद्यार्थिंनीं व वादकांनी नाशिकमधील विश्व मराठी संमेलनात जळगावचा झेंडा दिमाखात रोवला. या कलावंतांना बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत व प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नातून ही संधी मिळाली होती. या मिळालेल्या संधीचे […] - [गांधी तीर्थात 'पीस बिल्डर्स फोरम'चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा](https://khandeshprabhat.com/16017/): जळगाव, (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या उद्घाटन समारंभाप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, गांधी रिसर्च फाऊंंडेशनच्या डॉ. गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरीस, सावत्रीबेन, इंद्राजी उपस्थित होते. या कार्यक्रमात दि. ९ ते ११ मार्च दरम्यान शांतीच्या विविध आयामांना स्पर्श केला जाणार आहे. त्यासाठी माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रदर्शन, संवाद व चर्चासत्रे आयोजित केली आहेत. यामध्ये कॅनडासह, आंध्रप्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, मणिपूर, नागालॅंड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, […] - [महापालिकेत 'सत्ता' आपली, पण 'शिस्त' कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!](https://khandeshprabhat.com/16013/): हेमंत पाटील, (विशेष लेख) : जळगाव महानगरपालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कारभार आता खऱ्या अर्थाने रुळावर येणे अपेक्षित होते. मात्र, महापौर दालनात झालेली सत्ताधारी नगरसेवकांची पहिलीच बैठक ‘तडाखेबंद’ ठरण्याऐवजी ‘वादाची’ ठरली. या बैठकीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, महापालिकेत विरोधकांशी दोन हात करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपला आपल्याच नगरसेवकांमधील नाराजी आणि शिस्तीचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. ​बैठकीत उमटलेले पडसाद हे केवळ कचरा प्रश्न किंवा प्रभाग समितीच्या कामापुरते मर्यादित नाहीत, तर ते ‘मानापमानाच्या’ नाट्यातून उद्भवल्याचे दिसून येते. नगरसेवकांनी प्रशासनाविरुद्ध पुकारलेली आंदोलने आणि आयुक्तांना दिलेली थेट निवेदने, यावर महापौरांनी घेतलेला आक्रमक पवित्रा हा पक्षशिस्त लावण्याचा प्रयत्न असला, तरी नगरसेवकांच्या […] - [अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव](https://khandeshprabhat.com/16008/): जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज (वाळू) वाहतुकीत जप्त करण्यात आलेली वाहने प्रशासकीय इमारत आवार, आकाशवाणी चौक, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहेत. या वाहनांपैकी अनेक वाहनमालकांनी शासकीय दंडाची रक्कम तहसील कार्यालयात भरणा केलेली नसल्याने अशा वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने एकूण ३४ वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे जाहीर बोली पद्धतीने करण्यात येणार आहे. लिलावासाठी असलेल्या वाहनांची सविस्तर माहिती, हातची किंमत, दंडाची रक्कम तसेच लिलावाच्या सर्व अटी व शर्ती तहसील कार्यालय, जळगाव येथील नोटीस बोर्डावर तसेच www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लिलावात […] - [पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या](https://khandeshprabhat.com/16005/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी वाकोड गावाजवळ संयुक्तपणे मोठी कारवाई करत तब्बल ६३ किलो ७१० ग्रॅम गांजा आणि दोन आलिशान कार असा एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कारमधून गांजाची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व पहूर पोलीस स्टेशनच्या पथकाने वाकोड गावाच्या पुढे सापळा लावून संशयित कारचा पाठलाग […] - [जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम](https://khandeshprabhat.com/16002/): जळगाव, (प्रतिनिधी) : होळीच्या सणानिमित्त केवळ लाकडे न जाळता, शरीराला घातक ठरणारे ‘जंक फूड’ चा आपल्या आहारातून वर्ज करण्याचा संदेश देत आरोग्याचा जागर करण्याचा एक अनोखा आणि आदर्श उपक्रम संत ज्ञानेश्वर विद्यालयात राबविण्यात आला. ‘जंक फूड मुक्त होळी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या खाद्यान्न सवयींना तिलांजली देत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. ​कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते विधीवत होळी पूजनाने झाली. पारंपारिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. या होळीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मकरीत्या जंक फूडचे दहन करून, यापुढे तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा निश्चय केला. ​या प्रसंगी रूपाली आव्हाड यांनी […] - [प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या](https://khandeshprabhat.com/15995/): ​चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकुलखेडा येथे आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाले असून, एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ​अकुलखेडा येथील रहिवासी अनिता पाटील (वय अंदाजे ३२) आणि शिरपूर येथील देवानंद धनगर यांची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिताने देवानंदसोबतचे संबंध तोडण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला टाळत असल्याने देवानंदच्या मनात राग धुमसत होता. याच रागातून त्याने हा टोकाचा […] - ['अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा'; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन](https://khandeshprabhat.com/15992/): जळगाव, (प्रतिनिधी) : प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रमन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. युवराज वाणी, सचिव गोवर्धन पाटील, शिक्षणतज्ज्ञ प्रा. ललिता वाणी, संचालक वंदन वाणी, माजी मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे तसेच मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक व ज्योती बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि सादरीकरण पाहून महापौर दीपमाला काळे […] - [न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना](https://khandeshprabhat.com/15989/): जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींना सहा महिने साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच जैन इरिगेशन कंपनीला एकूण १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. विद्यमान कायद्यातील तरतुदीनुसार धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयाकडून जलदगतीने कठोर कारवाई केली जात आहे, हे या निकालावरुन दिसून आले. कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील रनेबेन्नुर येथील राजेंद्र ट्रेड लिंक या भागीदारी संस्थेने जैन इरिगेशन […] - [सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी](https://khandeshprabhat.com/15985/): ​नवी दिल्ली, (विशेष वृत्त) : देशात वाढत्या सायबर फसवणुकीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने आता डिजिटल सुरक्षेचे नियम अधिक कडक केले आहेत. १ मार्च २०२६ पासून देशभरात ‘सिम-बाइंडिंग’ (Sim-Binding) हा नवीन नियम अनिवार्य करण्यात आला आहे. या नियमामुळे आता ज्या मोबाईलमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड असेल, त्याच मोबाईलवर व्हॉट्सॲप आणि इतर मेसेजिंग ॲप्स वापरता येणार आहेत. ​आतापर्यंत व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम यांसारख्या ॲप्सवर एकदा लॉग-इन केले की, फोनमधून सिम कार्ड काढून टाकले तरी इंटरनेटच्या साहाय्याने ही ॲप्स सुरू राहायची. मात्र, १ मार्चपासून हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. नव्या नियमांनुसार, जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल, तर व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट आणि […] - [जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील 'स्थायी'चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा](https://khandeshprabhat.com/15981/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाब्या मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’ सभापती पदासाठी गुरुवारी (दि.२६ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, ही निवड आता केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर दुसरीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी आपले […] - ['अनुभूती'च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या](https://khandeshprabhat.com/15973/): जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठेभाऊ यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र आणि प्रेम दिले. याच आत्मीयतेच्या धाग्यातून अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे ‘भक्ती संगीत संध्या’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे, निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. ‘भाऊंच्या उद्यानात’ पार पडलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करून मोठ्याभाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. पांडुरंग नामी लागलासी ध्यास… या भक्तीगीताने कार्यक्रमाची […] - [रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!](https://khandeshprabhat.com/15970/): जळगाव, (प्रतिनिधी) : बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपयांची बॅग लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी छडा लावला आहे. गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत ७ संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्माणी यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली हे दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरातून वसुली करून परतत होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली होती. याप्रकरणी रावेर पोलीस […] - ['मह्य आंगन'मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन](https://khandeshprabhat.com/15965/): ​जळगाव, (प्रतिनिधी)  : जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुनीता येवले लिखित ‘मह्य आंगन’ या लेवा गणबोलीतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ​याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश म्हस्के उपस्थित होते. त्यांनी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “साहित्य निर्मितीत स्थानिक बोलींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवोदित कवी आणि लेखकांनी आपल्या मातृभाषेतूनच अधिक प्रगल्भपणे अभिव्यक्त होण्याची गरज आहे.” ​ ​ज्येष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे आणि जयश्री काळवीट यांनी ‘मह्य आंगन’मधील भावविश्वाचे कौतुक […] - [जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची 'मॉब लिंचिंग'; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू](https://khandeshprabhat.com/15962/): जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणे शिवारात सोमवारी रात्री ‘मुलं पळवणारी टोळी’ सक्रिय असल्याच्या संशयावरून एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून परिसरात खळबळ उडाली आहे. ​जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे शिवारात ‘लक्ष्मी जिनिंग’ परिसरात सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर सोनवणे यांच्या ३ वर्षीय चिमुरड्याला पळवून नेत असल्याचा संशय काही स्थानिकांना आला. या संशयाचा वणवा इतक्या वेगाने पसरला की, काही वेळातच […] - [राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा'तर्फे अभिवादन](https://khandeshprabhat.com/15959/): जळगाव, (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक, स्वच्छता आणि सेवाभावाचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जळगावात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्या कृतीतून समाजप्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या कार्यालयात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या सेवाभावी आणि समाजजागृतीच्या कार्याचे […] - [लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात](https://khandeshprabhat.com/15955/): ​मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : येथील योगमाया प्रतिष्ठान या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर” या संकल्पनेतून पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील ४०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला शब्दांकित केले. ​छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांनी केलेला संघर्ष, स्वराज्याची निर्मिती आणि त्यांचे लोककल्याणकारी नेतृत्व या पैलूंचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास व चिंतन करावे, या मुख्य हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली. मुक्ताईनगर शहरातील एकूण सहा परीक्षा केंद्रांवर ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. प्रत्येक केंद्रावर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. […] - [लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा 'उल्हास'](https://khandeshprabhat.com/15950/): ​हेमंत पाटील, (विशेष लेख) : ​जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील. रावेर तालुक्यातील विवरे या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्राने आज आपल्या सेवाभावी वृत्तीने संपूर्ण खान्देशच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धावता आढावा.. ​​डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री, स्वर्गीय गोदावरी वासुदेव पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. आई ‘हाडाची शिक्षिका’ असल्याने बालपणापासूनच त्यांच्यावर शिस्त आणि समाजसेवेचे संस्कार झाले. आईकडून मिळालेला हा शैक्षणिक आणि संस्कारांचा वारसा डॉ. पाटील यांनी केवळ जपला नाही, तर तो ‘गोदावरी फाउंडेशन’च्या […] - [शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात](https://khandeshprabhat.com/15947/): जळगाव, (प्रतिनिधी) : “दुःख वाटून घेऊया आणि सुख वाढवूया” हा उदात्त विचार उराशी बाळगून, संकटात सापडलेल्यांना आधार देणे हीच खरी माणुसकी आहे. याच भावनेतून लिनेस क्लबच्या वतीने एका गरजू कुटुंबाचा कोलमडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जळगावात ​काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका कुटुंबातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. या आपत्तीमुळे हतबल झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी लिनेस क्लबने पुढाकार घेतला. क्लबच्या अध्यक्षा रेखा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या पीडित कुटुंबाला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची मदत करण्यात आली. ​‘माणुसकी जपणे हेच आमचे ध्येय’ ​या प्रसंगी बोलताना अध्यक्षा रेखा वर्मा म्हणाल्या की, “कुणाच्या तरी चेहऱ्यावर […] - [जळगावात २६ फेब्रुवारीपासून 'खान्देश महोत्सव'चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ](https://khandeshprabhat.com/15944/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत शहरातील सागर पार्क मैदानावर हा महोत्सव पार पडणार असून, जळगावकरांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे. ​१८० स्टॉल्सवर खान्देशी संस्कृतीचे दर्शन.. या महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यंदा एकूण १८० स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. यात हस्तकला वस्तू, होम अप्लायन्सेस, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने आणि ऑफिस […] - ['दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना 'गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा'तर्फे अभिवादन](https://khandeshprabhat.com/15940/): जळगाव, (प्रतिनिधी) : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक प्रबोधनासाठी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज संघटनेच्या कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील मूल्यांचे […] - [भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी](https://khandeshprabhat.com/15935/): ​भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरात आयोजित या सोहळ्यात करणी सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करत त्यांच्या विचारांचा जागर केला. ​कार्यक्रमाची सुरुवात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना दामोदर राजपूत म्हणाले की, “आजच्या काळात केवळ महाराजांचा जयघोष करून चालणार नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक पालकाने आपल्या घराघरात शिवाजी राजे घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.” ​या सोहळ्याला करणी […] - [पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण](https://khandeshprabhat.com/15932/): ​वरणगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या १५ दिवसांपासून एका माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या माकडाने आतापर्यंत तब्बल ३५ ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. माकडाच्या या हिंसक रूपामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, वनविभागाच्या संथ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पिंपळगाव परिसरात माकडांची एक टोळी आली होती. त्यातील इतर माकडं निघून गेली असली, तरी एक माकड गावातच थांबले आहे. हे माकड आता हिंसक झाले असून, घरात घुसून महिला आणि वृद्धांवर अचानक झडप घालत आहे. इतकेच नव्हे तर स्वयंपाकघरातील वस्तूंची नासधूस करून हे माकड […] - [गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी](https://khandeshprabhat.com/15929/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : ‘रयतेचे राजे’ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, १९ फेब्रुवारी रोजी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगाव येथे महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या आदर्श विचारांवर चालण्याचा निर्धार सर्व पत्रकारांनी व्यक्त केला. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी आणि महासचिव भगवान सोनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्यक्ष जीवनात आणि पत्रकारितेत अंमलात आणण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. […] - [संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन](https://khandeshprabhat.com/15924/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाचे महत्त्व विषद केले. ​विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर कार्यक्रमात रंगत आणली. शिवचरित्रावर आधारित अंगावर शहारे आणणारे पोवाडे, स्फूर्तीदायक देशभक्तीपर नृत्य आणि शिवरायांच्या पराक्रमावर आधारित प्रभावी भाषणे सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या दमदार सादरीकरणामुळे संपूर्ण शालेय परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने निनादून गेला होता. ​या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या […] - [अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल](https://khandeshprabhat.com/15921/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भुसावळ येथे एका ३६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल ३१ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याने मोबाईलवर एक अनोळखी ॲप डाऊनलोड केले होते. या ॲपच्या माध्यमातून त्यांची एका व्यक्तीशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत तिसऱ्या एका व्यक्तीने या दोघांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणि तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवून तुमची बदनामी करू, अशी धमकी संशयितांनी […] - [टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न](https://khandeshprabhat.com/15918/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शारदा कॉलनी परिसरातील टोके शाळेत लिनेस क्लब जळगाव तर्फे नुकतेच भव्य दंत चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ​या शिबिरात प्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ. ऋषिकेश वराडे व डॉ. उमा वराडे यांनी मुलांच्या दातांची सखोल तपासणी केली. मुलांच्या दातांच्या तक्रारी जाणून घेत, ज्या मुलांना दातांच्या समस्या होत्या त्यांना तात्काळ औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच दात निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी मुलांना प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. ​या प्रसंगी प्रभाग १३ च्या नगरसेविका सुरेखा तायडे, दिपाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते उपस्थित सर्व मुलांना टूथपेस्ट व शैक्षणिक साहित्याचे वाटप […] - [लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील 'वाचन कट्ट्या'ला शालेय साहित्याची मदत](https://khandeshprabhat.com/15912/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या उदात्त हेतूने लीनेस क्लब जळगाव तर्फे आवार (ता. जळगाव) येथील ‘माय माती फाउंडेशन’ संचलित वाचन कट्ट्याला शालेय साहित्य प्रदान करण्यात आले. ​प्रभावती पाटील यांच्या कार्याचे कौतुक.. ​याप्रसंगी वाचन कट्ट्याच्या संचालिका प्रभावती पाटील यांच्या कार्याची पाहणी क्लबच्या सदस्यांनी केली. प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण मुलांसाठी त्या राबवत असलेला हा उपक्रम पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमासाठी अनुजा गुंजन बोथरा यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. ​या कार्यक्रमाला लीनेस क्लबच्या अध्यक्षा रेखा वर्मा, सचिव नीला चौधरी, माजी अध्यक्षा रेश्मा बेहराणी, अनिता कांकरिया, अलका कांकरिया तसेच आवार गावचे […] - [जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण](https://khandeshprabhat.com/15909/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्ताने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “शिवराय मना-मनात, शिवजयंती घराघरात” या संकल्पनेतून येत्या १९ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ७ वाजता प्रभाग ७ मधील शिवकॉलनी स्टॉप परिसरात महाराजांच्या एका भव्य-दिव्य प्रतिकृतीचा अनावरण व दर्शन सोहळा पार पडणार आहे. ​या मंगलप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, महापालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा प्रभागातील नगरसेवक विशाल भोळे, नगरसेविका अंकिता पाटील आणि नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवरायांचे जाज्वल्य विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आणि घराघरात पोहोचावेत, या उदात्त उद्देशाने या […] - [प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा 'एल्गार'; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!](https://khandeshprabhat.com/15906/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री पूर्णपणे थांबविण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला असून, त्यानंतरही प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि थेट गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा दिला आहे. ​सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी महापौर दालनात आयोजित प्लास्टिक विक्रेत्यांच्या तातडीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, वरिष्ठ आरोग्य अधीक्षक रमेश कांबळे, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष कमल शामनानी व धनराज चावला, डॉ. लीना पाटील यांच्यासह ‘माझे शहर माझी जबाबदारी’ ग्रुपचे सदस्य आणि प्लास्टिक विक्रेता […] - [शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व - संजय मारणे](https://khandeshprabhat.com/15903/): जळगाव, (प्रतिनिधी) : शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. असे पुणे येथील संचालक, इंडियन नॅचरल हनीबीज चे संजय मारणे यांनी मधमाश्यांचे विविध प्रकार, त्यांचे उत्पादने (By-products), बी व्हेनम (Bee Venom), परागीभवनाचे महत्त्व तसेच शेतीसाठी मधमाशी पालन कसे उपयुक्त आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी यवतमाळ कृषी […] - [जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा 'कस'; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!](https://khandeshprabhat.com/15899/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर, प्रशासकीय कामकाजात अत्यंत कळीच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड सोमवारी (दि.१६ फेब्रुवारी) विशेष महासभेत करण्यात आली. महायुतीने आपले वर्चस्व राखत स्थायी समितीच्या १६ जागांपैकी १५ जागांवर कब्जा मिळवला आहे. पहिल्या वर्षी विकासकामांना गती देण्यासाठी तिन्ही प्रमुख पक्षांनी अनुभवी चेहऱ्यांवर विश्वास दर्शवला आहे. ​महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर तातडीने विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष महासभा बोलावण्यात आली होती. या सभेच्या व्यासपीठावर महापौर, उपमहापौर यांच्यासह आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव शुक्ला यांची उपस्थिती होती. ​स्थायी […] - [प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण](https://khandeshprabhat.com/15896/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्याम प्रभाकर पाटील (वय १९) याने नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी नेहरू नगर येथील त्याच्या राहत्या खोलीत घडली. प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या ‘सुसाईड नोट’ वरून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ​मूळचा बोदवड (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी असलेला श्याम जळगावमध्ये राहून शिक्षण घेत होता. रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास, रूमवर कोणीही नसताना त्याने गळफास घेतला. त्याचा रूममेट सुट्टीमुळे गावी […] - [काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू](https://khandeshprabhat.com/15893/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील कालंका माता चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने पायी जाणाऱ्या हातमजुराला चिरडल्याची भीषण घटना घडली. प्रभाकर पाटील (वय ५५, रा. तेली चौक) असे मृताचे नाव असून, या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरची तोडफोड करत महामार्गावर रास्तारोको केला. ​प्रभाकर पाटील हे रात्री काम आटोपून भाजीपाला घेऊन पायी घराकडे परतत होते. कालंका माता चौफुलीजवळ डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ​जमावाचा उद्रेक आणि पोलीस कारवाई.. ​अपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक […] - [जळगावच्या 'आयटी एक्स्पो'मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन](https://khandeshprabhat.com/15889/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे आयोजित ‘JJITA आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) पार पडले. शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. ​या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, सीपी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रविण पाटील, प्रमा कंपनीचे अंकुर ढोले, ऑल कनेक्टचे संदिप बिरारी, पवन मंधारे, चेतन गावंडे, पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द, सिबा पाठक, आनंद जगदाळे, धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती. […] - [सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य 'आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६' ​](https://khandeshprabhat.com/15884/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. हा एक्स्पो दि. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे पार पडणार असून, याद्वारे जळगावकरांना आधुनिक तंत्रज्ञान जवळून अनुभवता येणार आहे. ​या तीन दिवसीय प्रदर्शनात साधारण ३० स्टॉल्स असून सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, आयटी सोल्यूशन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे स्टॉल्स असणार आहेत. उद्योग क्षेत्रातील दिग्गज, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकाच छताखाली येणार असून, उपस्थितांना थेट […] - [गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई](https://khandeshprabhat.com/15881/): ​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. ​जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहूनगर, जळगाव) हा तरुण उस्मानिया पार्क, शिवाजीनगर भागात मोटारसायकलवर गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची खात्रीशीर माहिती […] - [आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप](https://khandeshprabhat.com/15875/): जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेचा वापर केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ​सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी सावदा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर घडली. ​तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारण्यासाठी खडसे पोलीस ठाण्यात आले होते. खडसे यांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरच अधिकाऱ्यांना बोलावून मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. “तुम्ही कोट्यवधी रुपये […] - [अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण](https://khandeshprabhat.com/15871/): जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या बनात करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. तसेच जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सहकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नव्याने विकसीत केलेल्या जाती ‘जैन मॅडरिन-१’ ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (JISL) यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक आधुनिक आणि उत्पन्नक्षम संत्र्याचे नवीन वाण आहे. पारंपरिक संत्र्याच्या तुलनेत ही जात […] ## Pages - [संपर्क](https://khandeshprabhat.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95/): बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- हेमंत पाटील (जळगावकर) 9822781718 khandeshprabhat@gmail.com - [आमच्या विषयी](https://khandeshprabhat.com/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80/): महाराष्ट्रासह खान्देशातील (जळगाव, धुळे, नंदुरबार) मधील घडामोडींचे Video पहा खान्देश प्रभात वर. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील बातम्या आणि समाजाभिमुख Video, ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट दाखविण्यासाठी खान्देश प्रभात सदैव प्रयत्नशील आहे. दरम्यान खान्देश प्रभात या Youtube वर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा व्हिडिओ मधील मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (जळगाव शहर न्यायक्षेत्र ) - [Home](https://khandeshprabhat.com/): Latest News हेडावे येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत विकास कामास सुरवात कजगाव शेती शिवारात जनावरांचा उपद्रव- VIDEO रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रबंधक एस एस केडिया यांनी काढले गौरवोद्गार – VIDEO तुरटी पासून बनवली गणेश मूर्ती- VIDEO तरुणाने केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा -VIDEO धरणगावच्या माजी नगराध्यक्षाची पोलिसांविरोधात तक्रार edit post Uncategorized हेडावे येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत विकास कामास सुरवात by टीम खान्देश प्रभातAugust 16, 2021 edit post कृषी कजगाव शेती शिवारात जनावरांचा उपद्रव- VIDEO by टीम खान्देश प्रभातAugust 16, 2021 edit post जळगाव जिल्हा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रबंधक एस एस केडिया यांनी काढले गौरवोद्गार – VIDEO by टीम खान्देश प्रभातAugust 16, 2021 […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)