• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 2, 2021
in जळगाव जिल्हा
0
कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर संपन्न

जळगाव, दि. 2 (जिमाका) – अन्न व औषध प्रशासन, जळगाव आणि अन्नधान्य व आडत व्यापारी संघटना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगांव येथे अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना/नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने 1 ऑक्टोबरपासून विक्री बिलांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत परवाना क्रमांक नमुद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच अन्न धान्य घाउक विक्री, अडतदार, अन्न धान्य वितरक तसेच अन्न पदार्थ साठवणुकीसाठी वापरले जाणारे गोदाम याकरीता परवाना/ नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निराकरण करुन शिबिराच्या अनुषगांने परवाना नोंदणी ऑनलाईन पध्दतीव्दारे सुरू करण्यात आली.

या शिबिराचे आयोजन शशी बियाणी, अध्यक्ष, अन्न धान्य व आडत व्यापारी संघटना, बाजार समिती, जळगांव, विष्णुकांत मणियार, उपाध्यक्ष, विकास महाजन, सुनिल तापडीया, सचिव यांनी यशस्वीरित्या केले. या शिबिरास अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांचेतर्फे श्री. यो. कों. बेंडकुळे, सहायक आयुक्त, (अन्न) व श्री. विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, जळगांव हे उपस्थित होते. या शिबिराचा मोठ्या संख्येने आडत विक्रेते व अन्न धान्य विक्रेत्यांनी लाभ घेतला असे श्री. बेंडकुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Next Post
गोदावरी आईने राष्ट्रपित्याचे व्यक्‍तीमत्व आमच्या मनावर बिंबवल – डॉ.उल्हास पाटील

गोदावरी आईने राष्ट्रपित्याचे व्यक्‍तीमत्व आमच्या मनावर बिंबवल - डॉ.उल्हास पाटील

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add