• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एसटीच्या धडकेत रुग्णालय कर्मचारी ठार, दुचाकीचा चुराडा

जामनेर तालुक्यातील गोदरी जवळील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 29, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एसटीच्या धडकेत रुग्णालय कर्मचारी ठार, दुचाकीचा चुराडा

जामनेर, (प्रतिनिधी) : दुचाकी वरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या तरूणाला गोदरी गावालगत भरधाव एसटीने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

निलेश तुकडसिंग नाईक (डांगरे, वय २७, रा. गोदरी ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गोदरी येथे आई, वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, चार भाऊ यांच्यासह राहत होता. (केपी)तर जामनेर येथील रुबी स्टार हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियागृह विभागात सहाय्यक होता. रविवारी निलेश हा त्याची दुचाकी (एम एच २० जीवाय ४५७१) ने कामावर जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजता निघाला. गाव सोडल्यावर काही अंतरावर सोयगाव डेपोची बस क्रमांक (एम एच २० बीएल २३९३) ने त्याला जबर धडक दिली.

धडकेमध्ये त्याची दुचाकी दूरवर फरफटत गेली. त्यात निलेश जागीच ठार झाला. फत्तेपुर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (केपी)यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. तर बस चालकास ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे गोदरी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता.

Tags: accidentJamner
Next Post
रेल्वे लाईन ओलांडताना लागला रेल्वेचा धक्का ; तरूण जागीच ठार

रेल्वे लाईन ओलांडताना लागला रेल्वेचा धक्का ; तरूण जागीच ठार

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group