• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या !

डोके भिंतीवर आपटून बॅटने केला प्रहार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 12, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या !

वरणगाव येथील घटना

भुसावळ, (प्रतिनिधी ) : आयुध निर्माणीतील कर्मचारी असलेल्या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मोठया भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर अपटून बॅटचा जोरदार फटका मारून जागीच ठार केल्याची घटना बुधवार दि ११ रोजी घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठया भावाला ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुध निर्माणीतील कर्मचारी प्रदिप जयसिंग इंगळे हे दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी (कॉ. न. ४४) आले. थोड्याच वेळात मुक्ताईनगर येथुन मोठा भाऊ सतिष जयसिंग इंगळे बँकेच्या कामासाठी वसाहतीतील त्यांच्या घरा समोरील स्टेट बँकेत आला होता. बँकेतून लहान भावाकडे गेला असता घरात दोन्ही भावात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने हाणामारी झाली. त्यात मोठया भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर आपटले.

दरम्यान भाऊ मदतीसाठी गयावया करीत होता मात्र निष्ठुर भावाने क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यावर जोरदार वार करीत प्रदिपला जागीच ठार केलं. विशेष म्हणजे पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तो मयत भावाच्या डोक्याजवळच बसून होता. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेत संशयित मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे.

सतिष इंगळे व प्रदिप इंगळे हे दोघे भाऊ आयुध निर्माणीत नौकरीस होते. मात्र सतिष हा काही महिन्यापूर्वी बंदुकीच्या गोळी चोरी प्रकरणी निलंबीत होता. या दोघा भावात भांडण कशामुळे झाले होते, हे मात्र अद्याप समजले नाही. घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Tags: BhusawalCrimemurder
Next Post
विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास

विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

April 19, 2026
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!
जळगाव जिल्हा

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

April 19, 2026
रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत
गुन्हे

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

April 18, 2026
सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group