• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये धावले जळगावकर

जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राचा संयुक्त उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 21, 2021
in आरोग्य
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये धावले जळगावकर

जळगाव, (जिमाका) दि. 21 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र तर्फे  जळगावात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. या रन ची सुरूवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. पोवाडा सादरीकरणनंतर दौड सुरू झाली. याप्रसंगी खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी दिनेश पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर आदी उपस्थित होते.

दौडच्या उदघाटनप्रसंगी खा.उन्मेष पाटील म्हणाले की, युवा पिढीचे तन, मन सदृढ राहण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया उपक्रम हाती घेतला आहे. युवक देशाचा आधारस्तंभ असून उद्याचा सदृढ भारत निर्माण व्हावा, यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थाचे महत्व ओळखावे. देशभरात साडेसात कोटी युवक आज या अभियानात सहभागी होत आहेत. तन, मन सदृढ ठेवण्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी, शरीर सदृढ राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीत जर आरोग्य सुदृढतेची जागरूकता झाल्यास देशाची संविधानिक मूल्ये जपण्यास देखील मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस कवायत मैदानावर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक मार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर शेवट करण्यात आला. दौडच्या उद्घाटनप्रसंगी विनोद ढगे यांच्या पथकाने पोवाडा सादर केला. ‘फिट इंडिया’ची शपथ दिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदर नोंदणी करून निवडकच विद्यार्थ्यांना या दौडमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, आकाश धनगर, चेतन वाणी, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे आदींसह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या दौडमध्ये बेंडाळे महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.


 

Tags: Jalgaon cityJalgaon newsKhandesh Prabhat
Next Post
प्रगती विद्यामंदिर शाळेत कोविड-19 हे हस्तलिखितचे प्रकाशन

प्रगती विद्यामंदिर शाळेत कोविड-19 हे हस्तलिखितचे प्रकाशन

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group