जळगाव | दि.०१ ऑगस्ट २०२४ | समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण व जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच जळगावात संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी आ. किशोर दराडे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, नगराध्यक्ष बोदवड आनंद पाटील, मोहन आव्हाड, रवींद्र सोनवणे, सुनील काळे, मनपा उपायुक्त गणेश चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण व जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावी व इतर परीक्षांमध्ये गुणवंत झालेल्या १५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्तावनेमधून संघटनेच्या कामाविषयी आढावा घेऊन कार्यक्रमाविषयी अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी माहिती दिली. यानंतर शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा सत्कार करण्यात आला . तसेच पूजा कैलास पालवे महिला पोलीस पाटील झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नंतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी आ. किशोर दराडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी करिअर केल्यानंतर समाजासाठी देणं लागतं. या भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे सांगितले. किशोर पाटील जामनेर, सुनील लोंढे चाळीसगाव, वैभव वंजारी अंतुर्ली, कैलास वंजारी मुक्ताईनगर, गजानन नानोटे मालदाभाडी प्रास्ताविक प्रशांत नाईक यांनी केले , सूत्रसंचालन प्रणाली नाईक यांनी तर आभार महादू सोनवणे यांनी मानले.