• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आता एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या.. – करणदादा पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 4, 2024
in राजकीय
0
आता एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या.. – करणदादा पाटील

अमळनेर, दि.०४ – महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असे सगळेच प्रश्न सोडविण्यात भाजपा अपयशी ठरली आहे. त्यानंतरही तुम्ही त्यांना अनेकवेळा संधी दिली. आता परिवर्तनाची गरज असून एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले.

करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि. ३ रोजी अमळनेर तालुक्यातील लोणचारम, लोण खु/बु, लोण सीम, भरवस, झाडी, सबगव्हाण, चौबारी, जैतपीर, गलवाडे बु/खु, मंगरुळ आणि जानवे येथे प्रचार रॅली काढण्यात आली तर मंगरुळ आणि जानवे येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या. या कॉर्नर सभेप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील, मंगरुळचे सरपंच समाधान पारधी, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, ज्येष्ठ नागरिक भाईदास पाटील, वाल्मीक पाटील, ग्रा. पं. सदस्य मुकेश भदाने, अशोक पाटील, सचिन थाठे आदी उपस्थित होते.

करणदादा पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेसच्या काळात विकासोकडून शून्य टक्के व्याजदरावर मिळणाऱ्या कर्जावर आता शेतकऱ्यांना १८ जीएसटी भरावा लागणार आहे. ६ ते ७ रुपये प्रति लिटर कमी दराने दूध फेडरेशनला द्यावे लागत आहे. खा. उन्मेषदादा पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली. मात्र, १५ तारखेनंतर ते २ रुपयांचे ४ रुपये वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

सभेत, खा. शि. मंडळाचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, सचिन थाठे यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Next Post
जळगावात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त ; ७५ लाखापेक्षा अधिकचा मुद्दामाल हस्तगत

जळगावात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त ; ७५ लाखापेक्षा अधिकचा मुद्दामाल हस्तगत

ताज्या बातम्या

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

April 28, 2026
भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!
गुन्हे

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!

April 28, 2026
जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?
जळगाव जिल्हा

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

April 28, 2026
उष्णतेची लाट जीवघेणी ठरू शकते; घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी
आरोग्य

उष्णतेची लाट जीवघेणी ठरू शकते; घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी

April 27, 2026
JCL T20 : जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा
क्रिडा

JCL T20 : जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात ‘शिवराय स्वारी आग्रा’चा थरार
जळगाव जिल्हा

‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात ‘शिवराय स्वारी आग्रा’चा थरार

April 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group