• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 4, 2024
in राजकीय
0
एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

जळगाव, दि.०४ – वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल, आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केले.

त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे. यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे आदी उपस्थित होते.

एकलव्य संघटनेचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य संघटना निरंतर लढत असते. एकलव्य संघटनेच्या विचारांच्या माध्यमातून गाव खेड्यावर कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपेक्षित दुर्लक्षित समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल संघटनेने त्यांचे अभिनंदन केलेले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ व सबका विकास या धोरणावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघ व ७७ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वीर एकलव्य संघटनेने भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.

एकलव्य संघटनेचे हे पाऊल अत्यंत अभिमानाचे असून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलव्य संघटनेच्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन राजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, प्रदेश सचिव मधुकर पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, जळगाव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजूबाबा सोनवणे, रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष रवि सोनवणे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड आदी उपस्थित होते.


 

Next Post
आता एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या.. – करणदादा पाटील

आता एकवेळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या.. - करणदादा पाटील

ताज्या बातम्या

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group