• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात

पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 3, 2024
in राजकीय
0
करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात

पाचोरा, दि.०३ – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार,२ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी सहभागी होत पाचोरेकरांना मतदानासाठी साद घातली.

शिवसेनेचे उमेदवार करणदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात जावून घराघरापर्यंत पोहचून मशाल हे चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. करणदादा पाटील हे देखील स्वतः जनतेपर्यंत पोहचत आहेत. आता त्यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरवारी त्यांनी पाचोरा-भडगावच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाथीने पाचोरा शहरातील विविध भागात जावून ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयासमोरील म्हसोबा महाराज मंदिरात नारळ ओवाळून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन परिसर, चौधरी वाडा, बाहेरपुरा, मच्छी बाजार, आठवडे बाजार, रथ गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड, स्व. के. एम. पाटील व्यापारी संकुल, श्री. महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स, मानसिंगका कॉर्नर, गणेश प्लाझा मार्गे पुन्हा शिवसेना कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, नगरसेवक भैय्या चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भिकन आहीरे, किशोर वानखेडे, पिंटू वानखेडे, भूषण वानखेडे, विशाल वानखेडे, चंदू मिस्तारी, अतुल मराठे, विशाल महाजन, कामगार सेनाचे माजी जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, विनोद पाटील, बापूसाहेब पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, दादाभाऊ पाटील, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, एकनाथ अहिरे, देविदास पाटील, बापू पाटील, माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, शशी पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, मिथुन वाघ, राजू काळे, पप्पू राजपूत, इमरान पिंजारी, ललित वाघ, मुरान तडवी, प्रदिप वाघ, शरद पाटील, विक्रांत पाटील, बातसरचे माजी उपसरपंच धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, यशवंत पवार, भाऊसाहेब पाटील, अण्णा पाटील, बाळू पाटील यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Next Post
जावयाच्या पाठीशी उभे राहण्याचा जामनेर तालुक्यातील मतदारांचा निर्धार

जावयाच्या पाठीशी उभे राहण्याचा जामनेर तालुक्यातील मतदारांचा निर्धार

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add