जळगाव, दि.०6 – भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन भारतीय जनता पार्टी, जनसंपर्क कार्यालय जी.एम.फाउंडेशन व “वसंत स्मृती” कार्यालय, बळीराम पेठ येथे साजरा करण्यात आला. यावेळी ९४ वर्षीय जेष्ठ कार्यकर्ते नारायण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जेष्ठ कार्यकर्ते नारायण चौधरी यांनी कार्यकर्त्यांसमोर आजवरच्या पार्टी च्या खडतर प्रवासाचा अतिशय मोजक्या शब्दात आढावा मांडला, तसेच आजच्या परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थाकरता वेळोवेळी होणारे पक्षांतर याबाबत दुःख व्यक्त करून निष्ठेशी प्रतारणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुचक सल्ला चौधरी यांनी बोलताना दिला.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आ. चंदू पटेल, स्मिता वाघ, डाॅ. राधेशाम चौधरी, दीपक सूर्यवंशी, अमित भाटिया, अरविंद देशमुख, सुनिल खडके, प्रकाश बालानी, कैलास सोनवणे, शक्ति महाजन, विरण खडके, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, गोपाल पोपटांनी, जितेंद्र मराठे, भारती सोनवणे, सीमा भोळे, सुचिता हाडा, रेखा वर्मा, ज्योती निंभोरे, भैरवी वाघ, दीप्ती चिरमाडे
रेखा कुलकर्णी, रंजना वानखेडे, मीनाक्षी पाटील, छाया सारस्वत, सरोज पाठक, जयश्री पाटील, केतकी पाटील, रेखा पाटील, कांचन सोनवणे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, प्रदीप रोटे, योगेश पाटील, वंदना पाटील, चित्रा मालपाणी, भगत बालानी, आनंद सपकाळे, जयेश ठाकूर, अमित देशपांडे, मयूर कापसे, महेश पाटील, शोभा कुलकर्णी, अशोक कोष्टी, संजय शिंदे, राहुल घोरपडे, महादू सोनवणे व पदाधिकारी तसेच मंडळ अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.