जळगाव, दि.०१ – आकाशवाणी चौकाजवळील रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवनाच्या प्रांगणात उपस्थित भाविकांना संबोधित करताना संतश्री पुज्यपाद श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज म्हणाले की, आयुष्य म्हणजे काळाबरोबर पुढे जाणे होय. आपण संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवू, परंतु अशा टप्प्यावर पोहोचण्यासाठी जिथे खर्या मित्रांचा संबंध नसून चाकोरीचा किंवा खुशामत करणार्यांचा संबंध आहे. मात्र योग्य टप्प्यावर पोहोचण्यासाठी ध्येय निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे.
ज्याचे गंतव्य भगवंताशी एकरुप आहे असा मार्ग शोधण्यासाठी, स्वत:शी संघर्ष करणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. ज्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. साधु-संत, ऋषी-मुनी २४ तास मनाशी लढत राहिले आणि आज इथपर्यंत पोहोचले आहेत. स्वत:चे आणि तुमच्या कुटुंबाचे भले करा पण त्यांना स्वत:साठी लढायला शिकवा. यासाठी मन चंचल नसून स्थिर असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘रत्नप्रवाह’’ प्रवचन मालिका सुरु होणार..
▪️संतश्री पुज्यपाद श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांच्या श्रीमुखातून १२ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत रेल्वे स्थानकाजवळील खान्देश सेंट्रल मैदानावर १५ दिवसीय ‘‘रत्नप्रवाह’’ प्रवचन मालिका सुरु होणार असून जास्तीत जास्त धर्मप्रेमींना श्रवणाचा लाभ घेता येईल. असे श्री सकल जैन संघाचे अजय ललवाणी यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले.