• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निधी फाऊंडेशनच्या पॉकेट कार्डचे अनावरण !

महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 9, 2023
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
निधी फाऊंडेशनच्या पॉकेट कार्डचे अनावरण !

जळगाव, दि.०९ – राज्यभरात मासिक पाळी विषयावर कार्यरत असलेल्या निधी फाऊंडेशनतर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घराबाहेर पडताना आपल्या सोबत महत्त्वाच्या वस्तूंसोबतच सॅनिटरी नॅपकीन देखील असावे असा संदेश देणारे पॉकेट कार्ड निधी फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. नुकतेच भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते पॉकेट कार्डचे अनावरण करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात मासिक पाळी आणि महिलांच्या विविध विषयावर निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून वैशाली विसपुते या कार्यरत आहेत. मासिक पाळी कापडमुक्त अभियान, गाव दत्तक उपक्रम, सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन असे विविध प्रकारचे उपक्रम आजवर वैशाली विसपुते यांनी राबविले आहेत. महिलांना बऱ्याचदा घराबाहेर पडताना मासिक पाळी आल्यास मोठी अडचण निर्माण होते. महिलांची कुचंबणा लक्षात घेता निधी फाउंडेशनतर्फे एक लहान जनजागृती माहिती पत्रक तयार केले आहे.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच जनजागृती माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. माहिती पत्रकाचे चित्रा वाघ यांनी कौतुक करीत निधी फाऊंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माहिती पत्रकात महिलांनी घराबाहेर पडताना सोबत घ्यायच्या वस्तू, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, महिलांचे हक्क आणि अधिकार याची जाणीव करून देणारे संदेश देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील महिलांना या माहिती पत्रकाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती वैशाली विसपुते यांनी दिली आहे.


 

Next Post
मुलभूत सोयीसुविधांचा विकास’ योजनेंतर्गत तर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर

मुलभूत सोयीसुविधांचा विकास' योजनेंतर्गत तर्गत नऊ कोटी रुपये निधी मंजूर

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add