• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे अध्यक अशोक जैन यांना ‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्कार जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 6, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जळगाव, दि.६ – महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जगभरात प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या. दि.७ एप्रिल २०२३ रोजी, जैन हिल्स येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला उद्युक्त होईल अशा बुद्धिबळ क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिंचा सन्मान करण्यासाठी ‘महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन’ दरवर्षी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. बुद्धिबळ प्रसाराल नाविन्याची जोड देणाऱ्या मंदार वेलणकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार सोहळा होत असतो. याची सुरवात २०१७ पासून झाली आहे.

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संदीप गोहाड, संजय आढाव, राघव पठाडे यांच्या समितीने सदर पुरस्कार अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांना देण्याचे जाहीर केले. स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य असलेल्या अशोक जैन यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन आपल्या कुशल नेतृत्त्वाने महाराष्ट्रातील बुद्धिबळ क्षेत्राला एक वेगळी झळाळी मिळवून दिली. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.

जैन हिल्स येथे शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी, सकाळी १०.०० वाजता हा पुरस्कार महाराष्ट्राचे प्रथम ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

 


 

Next Post
पिंपळकोठे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला संगणक भेट

पिंपळकोठे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला संगणक भेट

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add