• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेत जयेश सपकाळे प्रथम तर वैभव पाटील द्वितीय

मुलींमध्ये पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे प्रथम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 1, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेत जयेश सपकाळे प्रथम तर वैभव पाटील द्वितीय

जळगाव, दि.०१ – जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा गुरूवारी घेण्यात आली. या स्पर्धेत १७ वर्षातील वयोगटात जळगावच्या जयेश सपकाळे याने सहा पैकी साडेपाच गुण घेत सरस टायब्रेकच्या आधारे प्रथम क्रमांक पटकावला, तर पाचोरा येथील वैभव पाटील याने साडेपाच गुण घेत दुसरा क्रमांक पटकाविला. श्रेयस उपासनी पाच गुण घेत तिसरा क्रमांक पटकावला.

तर मुलींच्या वयोगटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे हिने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेचे बक्षीस खेळाडूंना जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर देशमुख, नथू सोमवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर स्पर्धा कांताई सभागृहात घेण्यात आल्या. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस तेरा वर्षे वयोगटात युग कोटेचा भुसावळ, आर्य कुमार शेवाळकर पाचोरा, दुर्वेश कोळी जळगाव, सोहम चौधरी भुसावळ, दर्शन पाटील भुसावळ यांना देण्यात आले. तर अकरा वर्षे वयोगटात हिमांशू सरोदे भुसावळ, प्रथम नक्ष झवर जळगाव, द्वितीय चरण नाईक पाचोरा, नऊ वर्ष गटात रोनित बालपांडे पाचोरा, रुजूल सरोदे भुसावळ तर सात वर्षे वयोगटात समर्थ पोळ जळगाव यांना देण्यात आले.

निवड झालेले खेळाडू बुलढाणा येथे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान होणाऱ्या १७ वर्षातील राज्य अजिंक्यपद बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी, परेश देशपांडे, सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले. विजय खेळाडूंचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Next Post
जळगाव महापालिकेच्या भाजपा गटनेतेपदी राजेंद्र घुगे-पाटील

जळगाव महापालिकेच्या भाजपा गटनेतेपदी राजेंद्र घुगे-पाटील

ताज्या बातम्या

कुठे हजारोंचा ओघ, तर कुठे ‘बोटावर’ मोजण्याइतकी मते!
खान्देश

कुठे हजारोंचा ओघ, तर कुठे ‘बोटावर’ मोजण्याइतकी मते!

January 16, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group