• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये विज्ञान दिनी प्रोजेक्ट प्रदर्शनीचे आयोजन

विद्यार्थ्यांसह पालकांसाठी १ मार्च ला प्रदर्शन खुले

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 28, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये विज्ञान दिनी प्रोजेक्ट प्रदर्शनीचे आयोजन

जळगाव, दि. २८ – अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. वर्षभर विद्यार्थी मेकॅनिकल अँडव्हांटेज, मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारले आहेत.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘विज्ञान दिनी’ दि. २८ फेब्रुवारी ला विज्ञानासंबंधीत विविध विषयानुसार प्रोजेक्ट प्रदर्शनी व सादरीकरण विद्यार्थ्यांकडून होईल. १ मार्च पर्यंत हे प्रदर्शन असेल. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ.आर. स्वामीनाथन यांच्याहस्ते होईल.

विज्ञान या ज्ञानशाखेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाला धरून संशोधनात्मकदृष्टीने सादरीकरण केले जाईल. सोबतच माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित साधारणत: ३७ प्रोजेक्टचे अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केले जाईल. सादरीकरणामधील विशिष्ट विषयांवर प्रश्नोत्तर स्पर्धा घेतली जाईल. यानंतर तज्ज्ञ परिक्षकांकडून प्रोजेक्ट सादरीकरणातील विजेते निवडले जातील. विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनीसाठी निमंत्रीत काही शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा आपले प्रोजेक्ट सादरीकरणाची संधी असेल.

संशोधनाला चालना देण्यासाठी प्रदर्शन सर्वांसाठी खुले..
विद्यार्थ्यांमधील नवनवीन कल्पनांना संशोधकदृष्टीने चालना मिळावी, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट हे इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी पाहता येणार आहे. इयत्ता ४ ते ९ मधील विद्यार्थी व त्यांचे पालकांना हे प्रदर्शन दि. १ मार्च ला दुपारी ३ ते ६ या वेळेत अनुभूती निवासी स्कूल येथे पाहता येणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या पाल्यांमधील संशोधकवृत्तीला हेरून, वैज्ञानिकदृष्टीने त्याला आधार देण्यासाठी जास्तीतजास्त पालकांनीसुद्धा प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी केले आहे.

Next Post
कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षेत उत्तीर्ण

कु. रितू प्रविण मंडोरा सी. एस. परिक्षेत उत्तीर्ण

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add