जळगाव, दि.११ – येथील सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी साधना गिरीश महाजन यांनी निवड एकमुखाने करण्यात आली. साधना महाजन या जामनेर महानगरपालिकाच्या अध्यक्षा तथा ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या सुविद्य पत्नी आहेत. दरम्यान साधनाताई यांची निवड करून त्यांचे अभिनंदन समितीच्या वतीने करण्यात आले.
जळगाव शहरात गेल्या २२ वर्षांपासून सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. विविध उपक्रम , सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन असे विविध उपक्रम राबवले जातात, या वर्षी देखील शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या संदर्भात संपूर्ण कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे.
यावेळी जे.के.चव्हाण, सुरेंद्र पाटील, किरण बच्छाव, पुरुषोत्तम चौधरी, सुरेश पाटील, राम पवार, विनोद पाटील, समितीचे समनव्यक शंभु पाटील आदी उपस्थित होते.