• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वानुभवातून शिक्षण म्हणजे उद्योजकीय संस्कार – अथांग जैन

अनुभूती स्कूलमध्ये 'अर्थानुभूती' कॉमर्स वीकचे उत्साहात उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 31, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
स्वानुभवातून शिक्षण म्हणजे उद्योजकीय संस्कार – अथांग जैन

जळगाव, दि. ३१ – स्वानुभवातून काही उत्तम करता करता शिकत जावे ते असे शिकावे की आपण नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनण्याचे गुण स्वतःमध्ये विकसित करू शकतो. श्रद्धेय दादाजींनी (भवरलालजी जैन यांनी) या अनुभूती स्कूलची स्थापनाच ‘Enlightened Entrepreneurship’ ह्या प्रमुख उद्दिष्टावर केलेली आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतक्या चांगल्या शाळेत उद्योजकीय संस्कार मिळत आहेत, त्यादृष्टीने शिकायला मिळत आहे. असे मोलाचे विचार व्यक्त केले जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी.

अनुभूती निवासी स्कूलच्या कॉमर्स वीक म्हणजेच  ‘अर्थानुभूती’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास व शिक्षकगण स्वागत रथ, अशोक महाजन, प्रदीप्तो चॅटर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकवून जाणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी स्वतःहून हिरीरीने भाग घेत असतात हे विशेष.

उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यां समोर बोलताना अथांग जैन म्हणाले की, फाउंडर्स डे आणि कॉमर्स वीक या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग असतो. प्रत्येक जण आपापल्या कौशल्याचा, हुशारीचा उपयोग करीत असतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सर्व समावेशकता यावी यासाठी हे करणे खूप मोलाचे आहे. वेगवेगळ्या नावीण्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यात विद्यार्थी गुंतलेला असतो व तो जे करतो ते उत्तमच करत असतो हे भविष्यातील करियर किंवा जीवनासाठी मोलाचे आहे असे सांगून कॉमर्स वीक च्या ‘मॅनेजिंग फॉर सस्टॅनिबीलिटी…’ ही बॅकड्रॉपची संकल्पना, तीन दिवसांमध्ये आखलेले कार्यक्रम उत्तमच आहेत असे कौतुक त्यांनी केले. पृथ्वीला, पर्यावरणाला वाचवायचे असेल तर शासनाबरोबर व्यक्तींनी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. जी कंपनी पर्यावरण संरक्षणाचे काम करते त्या कंपनीचे उत्पादने नागरिकांनी घेतले तर पर्यावरण संरक्षणात त्यांचाही अप्रत्यक्ष हातभार लागेल हा महत्त्वाचा विचार त्यांनी उपस्थितांसमोर अथांग जैन यांनी मांडला.

‘नुक्कड’ पथनाट्य..

निसर्ग, पाणी इत्यादी बाबत नुक्कड पथनाट्य सादर करत तीन पाण्याचे रंग हिरवा म्हणजे शेतीसाठी, काळे म्हणजे गोरगरीब आणि लाल म्हणजे महिला सशक्तीकरण इत्यादी विषय घेऊन विद्यार्थ्यांनी मोठ्या कल्पकतेने सादरीकरण केले. वाणिज्य दृष्टीकोन ठेऊन प्रत्येक सादरीकरण करण्यात आले. नुक्कड पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सकारात्मक संदेश दिला.

अर्थानुभूती म्हणजेच कॉमर्स वीकचा समारोप..

अऩुभूती कॉमर्स वीकचे शनिवारी समापन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांच्या अंगी विक्री कौशल्य यावे यासाठी खास ‘ट्रेडिंग’ दालन म्हणजे स्टॉल मांडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजे विक्री कौशल्य त्यातून विविध वस्तू ते विकतील. सेल्समनशीप हा प्रात्यक्षिक विषय देखील विद्यार्थ्यांना अनुभवता आला. या संपूर्ण इव्हेंटचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांनीच केले.


Next Post
रेडक्रॉसच्या अद्ययावत रक्त संकलन कोचचे उद्घाटन

रेडक्रॉसच्या अद्ययावत रक्त संकलन कोचचे उद्घाटन

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group