जळगाव, दि.२४ – येथील आर्ट गॅलरीत जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनाला समर्पित असलेल्या “चारभिंती” चित्रप्रदर्शंनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्तेकरण्यात आले होते. या प्रदर्शंनात खान्देशातील ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य राजेंद्रमहाजन, प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, चित्रकार विकास मल्हारा, चित्रकारविजय जैन यांच्या कलाकृतींचा समावेश आहे आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, प्राणी, फुले, झाडे, माणसे,समाज यांचे प्रतिबिंब याचित्रप्रदर्शंनातून आपल्याला बघता येते, यांसह हे सकारात्मक संदेश देणारे पण आहे असेप्रतिपादन उद्घाटक अशोक जैन यांनी याप्रसंगी केले.
या प्रदर्शनाचे प्रास्ताविकशंभू पाटील यांनी केले. पु. ना. गाडगीळचे व्यवस्थापक संदिप पोतदार हे प्रमुख अतिथी होते. हे प्रदर्शन दिनांक ३० डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्राचार्य एस.एस.राणे, कवी अशोक कोतवाल, अनिल जोशी, दीपक चांदोरकर, चित्रकार पिसुर्वोसुरळकर, श्याम कुमावत, सचिन मुसळे, सुशील चौधरी, तरुण भाटे, जेष्ठ कलाशिक्षक एल. झेड.कोल्हे, जितेंद्र चौधरी, योगेश सुतार, रूपाली सोनवणे, हर्षल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.
सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. या प्रदर्शनातील राजेंद्र महाजन यांनी त्यांच्या चित्रात अंधाऱ्या रात्रीतील डोंगरदऱ्यांमधील भयाण निरवता, त्यांचे बोडखेपणाचा अनुभव मांडलेला आहे. त्यांच्या मनातील अस्वस्थता, तगमग, घुसमट ते या भव्य चित्रात परिणामकारकतेने सादर करत आहे.
विकास मल्हारा यांचा पिंड काहीसा अबोल,एकाकीपण स्वीकारलेले त्यांच्या चित्रात अमूर्त आकारांच्या राखाडीरंग योजनेतून आलेले दिसते. प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर हे नेहमीच सामाजिक व्यथा-वेदना चित्रांत मांडतात, रसिकांना विचार प्रवण करतात. चिंतनशील चित्रकार विजय जैन यांच्या चित्रात ग्रामभाव विश्वातील बैलाची मुख संवेदना, त्यांचा कष्टमय प्रवास काही प्रमाणात अमूर्त आकारात मातीचारंग घेऊन आलेली दिसते.
याआगळ्या चित्रप्रदर्शंनाला जैन फार्मा फूड फ्रेशचे संचालक अथांग जैन, मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा, ललित कला अकादमी नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले हेमंत सूर्यवंशी, जिल्हा कलाध्यापक अध्यक्ष एन. ओ. चौधरी, सचिव अरुण सपकाळे, प्राचार्य अतुल मालखेडे, प्राचार्य जगदीश पाटील, प्रा.संजय नेवे, कलाशिक्षक भिका पाटील, कलाशिक्षक वसंत नागपुरे, कलाशिक्षक वाय. आर. पाटील, चित्रकार जितेंद्र चौधरी, चित्रकार मनोज जंजाळकर आदी मान्यवरांनी चित्रप्रदर्शनाला भेटी दिल्या.