• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज.. – डॉ. बी. डी. जडे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 24, 2022
in कृषी
0
ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज.. – डॉ. बी. डी. जडे

जळगाव दि.२४ – आपल्या देशात कापूस पिकाचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता ४६१ किलो रूई प्रति हेक्टर आहे. जागतिक पातळीवर कापूस पिकाची उत्पादकता ७९१ किलो रुई प्रति हेक्टर आहे. देशात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ५.६४ क्विंटल आहे तर राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ३.७५ क्विंटल एवढीच आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळण्याकरीता ड्रिप फर्टिगेशन (ठिबक सिंचन आणि ठिबक मधून विद्राव्य खतांचा वापर) करणे काळाजी गरज आहे. असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बी. डी. जडे यांनी मांडले.

कापूस संशोधन आणि विकास संघटना हिसार (हरियाना) ह्यांनी भारतीय कृषी अनुसंधान संस्थान दिल्ली ह्यांच्या संयुक्तवतीने महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कापूस परिषदमध्ये संशोधन प्रबंध सादरीकरण करताना डॉ. बी. डी. जडे बोलत होते. कापूस संशोधन आणि विकास संघटना ह्यांनी डॉ. बी. डी. जडे ह्यांना ड्रीप फर्टिगेशनचा कापूस पिकामध्ये वापर ह्यावर सादरीकरणाकरिता विशेष आमंत्रित केले होते.

परिषदेमध्ये कापूस पिकाचे उत्पादन वाढण्याकरिता काय आमुलाग्र बदल केले पाहिजेत ते बी. डी. जडे ह्यांनी सुचविले. कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी १० क्विंटल आणि ठिबक सिंचनावर एकरी २० क्विंटल उत्पादन कसे घ्यावे हे कॉटन मिशन १.० सुरु असलेल्यांमध्ये देशभरात मार्गदर्शन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी कापसाचे झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. ह्या परिषदेसाठी कापूस पिकामध्ये काम करणारे पंजाब, हरीयाना, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगना आणि ओरिसा, दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ संशोधक, खाजगी बियाणे, किटक नाशके, औजारे कंपन्याचे अधिकारी ह्यांनी परिषदेमध्ये सहभाग घेतला. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, व. ना. मराठवाडा कृषी विद्यापीठ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मधील शास्त्रज्ञ ह्यांनी या परिषदेमध्ये शोध निबंध सादर केले.

कापूस पिकातील सुधारीत वाण, लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, कापूस पिकातील किडी आणि रोग, कापूस वेचणी यंत्र या विषयावर परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी विचार मांडले. कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे कुलगुरु डॉ. मेहता, डॉ.कुंभोज, डॉ. तोमर यांनी मांडले. कापूस संशोधन व विकास संघटनाचे सचिव डॉ. एम. एस. चौहान यांनी परिषदेचे आयोजन केले.


 

Next Post
बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग.. – माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग.. - माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add