• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 18, 2021
in शैक्षणिक
0
लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

जळगाव दि.18 प्रतिनिधी – भारताच्या स्वतंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल तालुक्यातील खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकसहभागातून निर्माण करण्यात आले. खर्ची खु. येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता यावी या उद्देशाने ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून “ध्येय अभ्यासिका” सुरू करण्यात आली. गावातच अभ्यास करण्यासाठी व पुस्तकांची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने अभ्यासिकेचे उद्घाटन जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून व फित कापून करण्यात आले. नानाभाऊ महाजन यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजे यातून समाज घडतो परिणामी आपल्या गावाचा विकास होण्यास हातभार लागतो. यासाठी ध्येय अभ्यासिकेचा सदुपयोग करून गावातील विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहनही नानाभाऊ महाजन यांनी केले. दरम्यान पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार यांनी फोनद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.

उद्घाटनप्रसंगी माजी सैनिक भिला माळी, प्रगतशील शेतकरी अजित पाटील, संतोष घोळके, किशोर माळी, संदिप राजपुत, बापू भिल आदी ग्रामस्थ व युवक उपस्थीत होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. अक्षय पाटील यांनी आभार मानले.

अभ्यासकिसाठी दिल्या देणग्या

खर्ची खु. येथील ध्येय अभ्यासिकेसाठी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, माजी सैनिक भिला माळी, श्री. किशोरजी, जगण बापू, प्रगतशील शेतकरी अजीत पाटील, पेट्रोलपंप संचालक समाधान पाटील यांनी देणग्या दिल्या असून १४,२०० रूपये यातून जमा झाले आहेत. अभ्यासिकेसाठी या उपयोग केला जात आहे.


 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatगांधी रिसर्च फाउंडेशन
Next Post
“स्माईल प्लिज” म्हणत महापौर जयश्री महाजन यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा

"स्माईल प्लिज" म्हणत महापौर जयश्री महाजन यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group