• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्व.हिरालाल जैन यांच्या स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

शिबिरात ४४१ बाटल्यांचे संकलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 13, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
स्व.हिरालाल जैन यांच्या स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

जळगांव, दि. १३ – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व.हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या ३२ व्या स्मृतिदिनी बुधवारी आयोजित रक्तदान शिबिरात ४४१ इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पीटल जळगाव या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.

स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. कंपनीतील सहकाऱ्यांनी रक्तदान करून रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची गरज भागवून सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात एकूण ४४१ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले.

जैन प्लास्टिक पार्क डेमो हॉल येथे कंपनीचे जुने सहकारी विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते औपचारिक उद्घाटन झाले. येथे जैन प्लास्टिकपार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क आणि जैन फूडमॉल येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. कांताई नेत्रालय येथे जैन स्पोर्ट अकॅडमी, कांताई नेत्रालय, जैन शॉप व जैन गोडाऊन विभागातील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जैन फूडपार्क येथे जैन फूड पार्क, जैन अॅग्रीपार्क, जैन एनर्जीपार्क आणि जैन डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले. याचे औपचारीक उद्घाटन सुवन शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जी. आर. पाटील, डॉ. संदीप पाटील, सुनिल गुप्ता, संजय पारख, टी.बी.पाटील, व्ही.पी.पाटील, किशोर बावीस्कर, प्रदीप सांखला, आर. डी. पाटील व जेठमल तापडिया आदि उपस्थित होते.

स्मृतिदिनानिमित्त अन्नदान
स्व. बाबा यांच्या स्मृतिदिनी सुमारे चौदाशेहून अधिक जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यात बालक आश्रम, हरिजन सेवक संघ मुलींचे वसतीगृह, गायत्री मंदीर, बाबा हरदास संघ आदी ठिकाणी भोजन पाठविले गेले त्याच प्रमाणे हेच मिष्टान्न स्नेहाच्या शिदोरी उपक्रमातील पाकीटातून वितरीत करण्यात आले.

Next Post
मदतीच्या हजारो हातांच्या उपस्थितीत हेल्प फेअर-४ चा समारोप

मदतीच्या हजारो हातांच्या उपस्थितीत हेल्प फेअर-४ चा समारोप

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add