• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 3, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपचार

जळगाव, दि. ०३ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक मनोरूग्ण तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला. कडक ऊन असो.. वा पाऊस असो.. वा सद्यस्थीतीला पडणारी कडाक्याची थंडी, या सर्वांमध्ये तो एका कोपर्‍यात बसून राही. स्वभावाने अत्यंत हळवे असणार्‍या डॉ.उल्हास पाटील यांच्या मनात त्या तरुणाविषयी आस्था निर्माण झाली.

एके दिवशी रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांशी डाॅ. पाटील यांनी त्या तरूणाच्या अवस्थेबाबत चर्चा केली. मग काय हा तरूण मानसोपचार विभागाकरीता आव्हान ठरला असून त्याच्यावर उपचार करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून तरूणावर आपण उपचार करू शकतो का? होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तरूण उपचारास तयार होईल का? किंवा पळून जाईल का? या अनेक शक्यता पडताळून पाहत आज प्रवेशद्वारा बाहेेर जावून त्या तरूणाला उपचारासाठी तयार करण्यात मानसोपचार तज्ञांनी यश मिळाले.

दरम्यानच्या काळात ना आंघोळ ना दाढी, डोईवरचे केस वाढलेले, अंगात मळकट कपडे असलेल्या या तरूणाची सर्वप्रथम दाढी, कटिंग करण्यात आली. या नंतर स्वच्छ कपडे देण्यात आले. वार्डात नेवून त्याची आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले आहे. या तरूणावर उपचार देखिल सुरु झाले असून रूग्णाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

वाट चुकलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणणार.. – माजी खा. डॉ उल्हास पाटील
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. व्यसनामूळे वाट चुकलेल्या देशाचे भवितव्य असलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानसोपचार विभाग करणार असून जास्तीत जास्त तरूणांनी उपचार करून घ्यावे असे आवाहन केले.


 

Next Post
ॲग्रोवर्ल्डचा ‘शेतकरी ते ग्राहक’ उपक्रम स्तुत्य.. – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ॲग्रोवर्ल्डचा ‘शेतकरी ते ग्राहक’ उपक्रम स्तुत्य.. - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add