• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर मतदारसंघातील तीन सिंचन बंधारे दुरुस्तीसाठी ८१ लाखांचा निधी मंजूर

भिलाली सह धानोरा व पातोंडा सिंचन बांधचा समावेश; आ.अनिल पाटलांचे प्रयत्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 1, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमळनेर मतदारसंघातील तीन सिंचन बंधारे दुरुस्तीसाठी ८१ लाखांचा निधी मंजूर

अमळनेर, दि. ०१ – अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त झालेला भिलाली येथील बोरी नदीवरील केटीवेअर तसेच धानोरा येथील सिमेंट नाला बांध आणि पातोंडा येथील गॅंबियन बांध यांच्या दुरुस्तीसाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी ८१ लाखांचा निधी मंजूर झाल्याने दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद जलसंधारण विभाग नाशिक येथील १११ दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मृदू जलसंधारण विभागाचा शासन निर्णय २७ जानेवारी रोजी झाला असून यात अमळनेर मतदारसंघातील तीन कामांचा समावेश झाला आहे, त्यात अत्यंत आवश्यक असलेल्या पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील भिलाली येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४९.९ लक्ष,धानोरा येथे माळण नदीवर असलेल्या सिमेंट नाला बांधच्या दुरुस्तीसाठी ३०.३१ लक्ष तर पातोंडा येथील गॅंबियन बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १.५४ लक्ष याप्रमाणे निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यात प्रामुख्याने भिलाली येथील बोरी नदीवरील केटीवेअरची रायझिंग वॉल वाहून गेल्याने यंदा चांगला पाऊस होऊनही या बंधाऱ्यात पाणी साचले नाही, परिणामी भिलालीसह परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मृदू व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा केल्याने या केटीवेअरच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आमदारांनी दुरुस्तीचा मोठा प्रश्न मार्गी लावल्याने याठिकाणी असलेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होणार असून पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत आहे. यासोबतच धानोरा येथील माळण नदीवर असलेला सिमेंट नाला बांधच्या शेजारील मातीचा बांध वाहून गेल्याने याठिकाणी पाणी न थांबता पुढील आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाव्य धोका आणि बंधाऱ्याची गरज लक्षात घेता आमदारांनी दुरुस्तीसाठी निधी मिळविला असून, पातोंडा येथील गॅंबियन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचाही प्रश्न सुटला आहे.

या तिन्ही गावांच्या मंजुरी बद्दल ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत. तर आमदारांनी ही कामे मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृदू व जलसंधारण विभागाचे मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्ता भरणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

त्या 12 कोटीच्या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यासाठी आमदारांचे प्रयत्न..
अमळनेर मतदारसंघात भिलाली, फाफोरे, अंबापिंप्री, शेळावे, इंधवे, रामेश्वर यासह एकूण १२/१३ गावांमध्ये १२ कोटींचे सिमेंट बंधारे मंजूर झाले असताना सदर बंधाऱ्याचे काम शासनाने आहे. त्या स्थितीत कोविड कालावधीत आर्थिक अडचणीमुळे स्थगित केले होते. मात्र अमळनेर मतदारसंघ सतत अवर्षणप्रवण असल्याने व पाण्याचा दुसरा कोणता सोर्स नसल्याने ही स्थगिती उठवून तातडीने काम सुरू करावे, या मागणीचा पाठपुरावा आमदार अनिल पाटलांनी संबंधित मंत्र्यांकडे केला असून लवकरच स्थगिती उठवली जाऊन वरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी विशेष फायदा होऊ शकेल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.


Next Post
भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प.. – अशोक जैन, अध्यक्ष-जैन उद्योग समुह

भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प.. - अशोक जैन, अध्यक्ष-जैन उद्योग समुह

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group