• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 21, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

​जळगाव, प्रतिनिधी : महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या बीव्हीजी कंपनीच्या भोंगळ कारभारावर स्थायी समितीच्या सभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीच्या हमीपत्रात स्वतःची ५० वाहने असल्याचे नमूद असताना जोडलेल्या यादीत सुमारे १०० वाहनांचे क्रमांक आहेत, आणि याशिवाय महापालिकेची १२० हून अधिक वाहने वापरण्यासाठी दिली असतानाही प्रत्यक्षात कचरा उचलण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याचा गंभीर मुद्दा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मांडला.

कंपनीला आतापर्यंत २५ कोटी रुपयांहून अधिक देयके अदा केल्यानंतरही नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. कागदावर दाखवलेली वाहने प्रत्यक्षात कुठे आहेत, असा सवाल करत देशमुख यांनी वाहनांची उपलब्धता, देखभाल-दुरुस्ती आणि खर्चाचा सविस्तर हिशेब मागितला आहे.

​पूर्वी खासगी वजनकाट्यावर होणाऱ्या कचऱ्याच्या वजनात महापालिकेचा स्वतःचा वजनकाटा सुरू झाल्यानंतर लक्षणीय घट झाल्याचे सांगत, वजनपावत्या आणि संकलनाच्या नोंदींची तुलनात्मक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली. महापालिकेच्या वाहनांची देखभाल न झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका सभेत घेण्यात आली.


 

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add