• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या किरण पाटील यांचा जागीच मृत्यू; एमआयडीसी पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 21, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडिया पाहण्यासाठी बसलेल्या महिलांजवळ वाहनाचा प्रखर लाईट पडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित घटनेत झाले. या वादात चाकूने वार करण्यात आल्याने किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांनी काही तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडी शिवारातील माऊली नगर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी काही महिला घराबाहेरील ओट्यावर बसून कार्यक्रम पाहत होत्या. दरम्यान, किशोर छगन पाटील हे दुचाकीवरून रस्त्याने जात असताना त्यांच्या वाहनाचा प्रखर प्रकाश महिलांच्या चेहऱ्यावर पडल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक होऊन वाद वाढत गेला. त्यानंतर संशयित रोहित पाटील आणि मयूर पाटील यांनी किशोर पाटील यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हा वाद मिटवण्यासाठी किरण विठ्ठल पाटील हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, याचवेळी संशयितांनी त्यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर किशोर पाटील हेही जखमी झाले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या किरण पाटील यांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेनंतर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किरण पाटील यांना मृत घोषित केले, तर किशोर पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनीही रुग्णालयात जाऊन मृताच्या नातेवाईकांची व मित्रपरिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रोहित पाटील आणि मयूर पाटील या दोन संशयितांना काही तासांत ताब्यात घेतले असल्याचे कळते. हे संशयित तरुण १९ ते २० वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेमागील नेमके कारण काय, वादाला अन्य कोणती पार्श्वभूमी होती का आणि या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप आणि हल्ल्यामागील कारण स्पष्ट होणार आहे.


 

ताज्या बातम्या

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add