• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

जळगावहून २१ ऑक्टोबरला प्रस्थान; भुसावळसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 21, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

जळगाव, प्रतिनिधी : सणासुदीच्या दिवसांत रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने मध्य रेल्वेने जळगाव ते पानिपतदरम्यान विशेष रेल्वे फेरी चालविण्याचे नियोजन केले आहे. या सुविधेमुळे जळगाव आणि परिसरातील प्रवाशांना उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवासाचा आणखी एक पर्याय मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०१०६७ जळगाव-पानिपत विशेष रेल्वे बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावरून रवाना होईल. दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी ४ वाजता ती पानिपत येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०६८ गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पानिपत येथून सुटणार आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी जळगाव स्थानकावर दाखल होईल.

भुसावळसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा

जळगावहून प्रवास सुरू केल्यानंतर ही रेल्वे भुसावळ, खंडवा, भोपाळ, बिना, आग्रा कॅन्ट, पलवल आणि नवी दिल्ली या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनाही पानिपत आणि उत्तर भारताच्या दिशेने प्रवास करण्याची सुविधा मिळेल.

विशेष रेल्वेला एकूण १९ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये शयनयान श्रेणीचे १०, सामान्य द्वितीय श्रेणीचे सात आणि द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅनचे दोन डबे असतील. सामान्य श्रेणीतील सात डब्यांमुळे अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येईल.

प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन

या विशेष गाडीच्या तिकिटांसाठी प्रवाशांना ‘रेलवन’ ॲपचा वापर करता येईल. गाडीच्या वेळा, थांबे आणि तिकीट उपलब्धतेची माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ किंवा एनटीईएस ॲप तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add