• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

जळगाव, प्रतिनिधी : “शब्दांना धार नव्हती आणि शाईत रक्त नव्हतं, पण आज जळगावच्या मातीने जे अनुभवलं, तो इतिहास लिहायला कदाचित शब्दही अपुरे पडतील!” श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जळगाव विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री दुर्गामाता महादौडीने’ आज, २० ऑक्टोबर रोजी जळगावच्या इतिहासात एका सुवर्ण पानाची नोंद केली. पहाटे ठीक ५:३० वाजता ‘श्री शिवतीर्थ’ कोर्ट चौकातून निघालेल्या या महादौडीत केवळ गर्दी नव्हती, तर तो धगधगत्या राष्ट्रभक्तीचा महापूर होता.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. नंतर त्यांच्या हस्ते भगवा ध्वजाचे पूजन करून पुष्प वृष्टी करण्यात आली. यावेळी रुपाली वाघ, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, पितांबर भावसार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पहाटेच्या त्या काळ्याकुट्ट अंधारात, जेव्हा सबंध जग सुखाच्या झोपेत होतं, तेव्हा जळगावचे रस्ते ‘जगदंब, जगदंब’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या जयघोषाने थरथरले! कपाळावर चंद्रकोर, डोळ्यांत अंगार, हातात ताठ उभा असलेला भगवा झेंडा आणि अनवाणी पायाने रस्त्यावरून धावणारी हजारो तरुण पोरं… हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला आणि डोळे पाणावले. असं वाटत होतं की, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी छातीचा कोट करून लढणारे छत्रपती शिवरायांचे तेच गत जीवनातील निष्ठावंत मावळे आज या जळगावच्या मातीत धारकऱ्यांच्या रूपाने पुन्हा जन्मले आहेत.

“आजची उगवती पिढी जेव्हा मोबाईलच्या पडद्यावर आणि व्यसनाच्या दलदलीत स्वतःचं आयुष्य वाया घालवते आहे तेव्हा यात सहभागी मुलांना पहाटे उठवून त्यांच्या नसानसात राष्ट्रभक्तीचं रक्त सळसळवायला लावणारी ही संघटना आहे.

या महादौडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आईसाहेब जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या हजारो माता-भगिनी आणि लहान मुले यामध्ये सामील झाली होती. जळगावकरांनी घराघरांसमोर पायघड्या घालून अथांग रांगोळ्या काढून आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून या महादौडीचे स्वागत केले. जगदंब देवी मंडळात प्रांगणात जेव्हा हजारो धारकऱ्यांनी एका सुरात महाआरती केली तेव्हा जळगावची माती धन्य झाली.

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख आकाश फडे, तालुका प्रमुख परीस महाराज, शहर प्रमुख विजय कासार, दौड प्रमुख योगेश्वर गुरुजी यांच्यासह असंख्य धारकऱ्यांनी महादौडच्या मार्गाची आणि संपूर्ण प्रशासकीय नियोजनाची तयारी अत्यंत देखणी व सुंदर केली होती

येत्या १ नोव्हेंबर ला आढावा बैठकीचे निमंत्रण दिले या वर्षीची मोहिम सांगली वरून गुरुजींनी निरोप दिला की श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड मार्गे पावनखिंड सर्व धारकरी पुढील मोहिमेच्या नियोजनात लागले.


 

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add